suresh prabhu

मुंबईतील रेल्वे प्रश्नांवर तातडीने उपाययोजना - रेल्वेमंत्री

 मुंबईतील रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

Jan 2, 2015, 02:32 PM IST

रेल्वेच्या प्रभूंचा मेगा वसुलीचा प्लान, बजेट झटका देणारं?

 रेल्वेच्या भाड्यात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे. माजी वित्तीय सेवा सचिव डी. के. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय समितीनं रेल्वेत नियमित आणि सतत वाढ करण्याची शिफारस केलीय. रेल्वे भाड्यातील वाढीला या समितीनं सेक्टर आणि आरबीआयचा डेटा क्वार्टली कंझ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) सोबत जोडण्याचीही शिफारस करण्यात आलीय. मंगळवारी या समितीनं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना रिपोर्ट सादर केलाय. 

Jan 1, 2015, 03:00 PM IST

मुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य - सुरेश प्रभू

मुंबईतील रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. तसेच ३१ मार्चपर्यंत बहुतेक प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

Dec 13, 2014, 07:50 PM IST

सुरेश प्रभू मातोश्रीवर, कोकणसह मुंबईतील रेल्वे प्रश्न सोडविणार

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या दर्शन घेतल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, प्रवाशांच्या समस्या सोडवण्याबाबत अॅक्शन प्लॅन ठरवणार आहेत, असे आश्वासन मुंबईत आलेल्या रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिले.

Nov 22, 2014, 08:14 AM IST

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी 'प्रभू' आले धावून

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी 'प्रभू' आले धावून

Nov 21, 2014, 11:36 PM IST

मोदी ब्रिगेडचं खातेवाटप जाहीर: पर्रिकर संरक्षण मंत्री, तर प्रभूंकडे रेल्वे खातं

मोदी सरकारचं पहिला विस्तार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्र्यांच्या खात्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्राला २५ वर्षांनंतर रेल्वे मंत्रालय मिळालंय. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर देशाचे नवे संरक्षण मंत्री झालेत. 

Nov 10, 2014, 12:07 AM IST

उद्धव ठाकरेंचं 'एकला चलो रे'चा नारा, चेंडू पुन्हा भाजपच्या कोर्टात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय. भाजप जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेणार असेल तर शिवसेना विरोधी बाकावर बसेल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेचे विधानसभेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आलीय. 

Nov 9, 2014, 07:52 PM IST

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सुरेश प्रभू भाजपमध्ये!

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावणारे सुरेश प्रभू यांनी आज सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपाने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

Nov 9, 2014, 05:24 PM IST

भाजपला हवेत सुरेश प्रभू, शिवसेनेची 'सन्मानजक' नवी खेळी

महाराष्ट्रात सरकारमध्ये सन्मानजक स्थान दिलं तरच शिवसेना केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमाला उपस्थित राहील, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. भाजपबरोबर सेनाही अधिक आक्रमक झाली आहे.

Nov 8, 2014, 02:24 PM IST

नदीजोड प्रकल्प पूर्ण करा - सर्वोच्च न्यायालय

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या देशातील नद्या जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची योजना लवकरात लवकर पूर्ण करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे याबाबत केंद्राला निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत प्रकल्पाचे माजी प्रमुख सुरेश प्रभू यांनी केले आहे.

Feb 28, 2012, 09:25 AM IST