मोदी ब्रिगेडचं खातेवाटप जाहीर: पर्रिकर संरक्षण मंत्री, तर प्रभूंकडे रेल्वे खातं

मोदी सरकारचं पहिला विस्तार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्र्यांच्या खात्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्राला २५ वर्षांनंतर रेल्वे मंत्रालय मिळालंय. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर देशाचे नवे संरक्षण मंत्री झालेत. 

Updated: Nov 10, 2014, 03:48 PM IST
मोदी ब्रिगेडचं खातेवाटप जाहीर: पर्रिकर संरक्षण मंत्री, तर प्रभूंकडे रेल्वे खातं title=

नवी दिल्ली : मोदी सरकारचं पहिला विस्तार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्र्यांच्या खात्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्राला २५ वर्षांनंतर रेल्वे मंत्रालय मिळालंय. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर देशाचे नवे संरक्षण मंत्री झालेत. 

रविवारी सकाळीच तब्बल २१ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यात ४ कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश होता. त्यामुळं आता अनेक खात्यांना नवीन मंत्री मिळालेले आहेत. 

असं असेल मोदींचं मंत्रिमंडळ :

कॅबिनेट मंत्री : 

  • राजनाथ सिंह - गृह खातं
  • सुषमा स्वराज - परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
  • अरुण जेटली - अर्थ मंत्रालय, माहिती आणि प्रसारण
  • व्यंकय्या नायडू - नगर विकास, गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन, संसदीय कामकाजमंत्री
  • नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग, शिपिंग 
  • मनोहर पर्रिकर - संरक्षण
  • सुरेश प्रभू - रेल्वे
  • सदानंद गौडा - कायदे आणि न्याय
  • उमा भारती - जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन
  • डॉ.नज्मा हेपतूल्ला - अल्पसंख्याक व्यवहार
  • रामविलास पासवान - ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
  • कलराम मिश्रा - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
  • मनेका गांधी - महिला व बालकल्याण
  • अनंत कुमार - रासायनिक आणि खते
  • रविशंकर प्रसाद - माहिती तंत्रज्ञान
  • जनत प्रताप नड्डा - आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  • अशोक गजपती - नागरी उड्डयन
  • अनंत गिते - अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
  • हरमित कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग
  • नरेंद्रसिंह तोमर - खाण आणि लोहखनिज
  • बिरेंदरसिंह चौधरी - ग्रामविकास, पंचायत राज, पेयजल आणि स्वच्छता
  • ज्योएल ओराम - आदिवासी विकास विभाग
  • राधामोहन सिंह - कृषी विभाग
  • थावरचंद गहलोत - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण
  • स्मृती इराणी - मानव संसाधन विकास(एचआरडी)
  • डॉ. हर्ष वर्धन - विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान

राज्यमंत्री :

  • जनरल व्ही.के.सिंह - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी (स्वतंत्र प्रभार) परराष्ट्र व्यवहार अनिवासी भारतीय प्रकरणाचे
  • इंदरजितसिंह राव - नियोजन (स्वतंत्र प्रभार), संरक्षण
  • संतोषकुमार गंगवार - वस्त्रोद्योग (स्वतंत्र प्रभार),
  • बंडारू दत्तात्रय - श्रम आणि रोजगार (स्वतंत्र प्रभार),
  • राजीव प्रताप रुडी - कौशल्य विकास आणि उद्योजकता(स्वतंत्र प्रभार), संसदीय कामकाज
  • श्रीपाद नाईक - आयुष (AAYUSH)(स्वतंत्र प्रभार), आरोग्य आणि कुंटुब कल्याण
  • धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस  (स्वतंत्र प्रभार)
  • सरबानंद सोनोवाल - युवक आणि क्रीडा विभाग (स्वतंत्र प्रभार)
  • प्रकाश जावडेकर - पर्यावरण, वने आणि हवामान बदल (स्वतंत्र प्रभार)
  • पियूष गोयल - ऊर्जा, कोळसा(स्वतंत्र प्रभार), नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा(स्वतंत्र प्रभार)
  • जितेंद्र सिंह - ईशान्येकडील प्रदेश विकास, पीएओ(स्वतंत्र प्रभार),ग्राहक तक्रार आणि निवृत्त वेतन, अणू ऊर्जा
  • निर्मला सितारामण - वाणिज्य आणि उद्योग (स्वतंत्र प्रभार)
  • डॉ. महेश शर्मा - सांस्कृतिक विभाग(स्वतंत्र कारभार), पर्यटन, नागरी उड्डयन
  • मुख्तार अब्बास नकवी - अल्पसंख्याक, संसदीय कामकाज
  • रामकृपाल यादव - पेयजल आणि स्वच्छता
  • हरिभाई चौधरी - गृह विभाग
  • संवरलाल जाट- जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन
  • मोहनभाई कुंदारीया - कृषी विभाग
  • गिरीराज सिंह - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम
  • हंसराज अहिर - केमिकल्स आणि खते
  • जी.एम.सिद्धेश्वरा - अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
  • मनोज सिन्हा - रेल्वे  Railways
  • निहाल चंद - पंचायत राज
  • उपेंद्र कुशवाह - मानव संसाधन विकास (एसआरडी)
  • राधाकृष्णन पी. - रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जल वाहतूक
  • किरेन रिज्जू - गृह मंत्रालय
  • क़ष्षन पाल - सामाजिक न्याय आणि सबलीकरण
  • संजीवकुमार बल्यान - कृषी विभाग
  • मनसुखभाई वसावा - आदिवासी विकास विभाग
  • रावसाहेब दानवे - ग्राहक तक्रार निवारण, अन्न आणि सार्वजनिक वितरण
  • विष्णूदेव साई - खाण आणि लोहखनिज
  • सुदर्शन भगत - ग्रामविकास विभाग
  • रामशंकर कथेरिया - मानव संसाधन विकास (एचआरडी)
  • वाय.एस.चौधरी - विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान
  • जयंत सिन्हा - वित्त विभाग
  • राज्यवर्धन राठोड - माहिती आणि प्रसारण
  • बाबूल सुप्रियो - शहरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन
  • साध्वी निरंजना - अन्न प्रक्रिया उद्योग
  • विजय सांपला - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.