sindhudurg

कोकणात अतिवृष्टी, अनेक नद्यांना पूर

 रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशार हवामान खात्यानं दिलाय. तर 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं किनावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 24 तासात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झालीय. सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. सकाळपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरु आहे. 

Jul 12, 2014, 05:55 PM IST

कोकणात मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर दरड

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर आणि  रायगडमधील सुकेळी घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला. काही काळ मुंबई महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु होती. दरड बाजुला केल्यानंतर वाहतूक पूर्वत झाली. दरम्यान, येत्या 48 मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Jul 11, 2014, 08:58 PM IST

सिंधुदुर्गात जोरदार पाऊस

सिंधुदुर्गात जोरदार पाऊस

Jul 11, 2014, 03:06 PM IST

आम्ही कंपनीचे एम्प्लॉईज नाही; नितेश राणेंना प्रत्यूत्तर

‘आम्ही कुठल्याही कंपनीचे एम्प्लॉईज नाही...’ असं म्हणत नाराज जिल्हा पदाधिकारी आणि माजी आमदार राजन तेली आणि काका कुडाळकर यांनी राणे मंडळींना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला पत्र लिहून दुखावलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.

Jul 3, 2014, 08:13 PM IST

मुलाच्या पराभवानंतर राणे प्रथमच सिंधुदुर्गात

कोकणातील लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांच्या पराभवानतर काँग्रेसनेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे आज महिन्यानंतर आपल्या होम पीच वर म्हणजे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.

Jun 19, 2014, 11:56 AM IST

सेनेचे खासदार भराडी देवीच्या दर्शनाला...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अठरा नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत....

May 25, 2014, 11:16 AM IST

रत्नागिरी - सिंधुदुर्गात वादळी पावसाचा तडाखा

रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागाला आज सायंकाळी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. विजांच्या गडगडाटासह रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तर संध्याकाळी परत पावसाने हजेरी लावत सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडाखा दिला.

May 7, 2014, 06:43 PM IST