कोकणात मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर दरड

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर आणि  रायगडमधील सुकेळी घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला. काही काळ मुंबई महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु होती. दरड बाजुला केल्यानंतर वाहतूक पूर्वत झाली. दरम्यान, येत्या 48 मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Updated: Jul 11, 2014, 09:41 PM IST
कोकणात मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर दरड title=

रत्नागिरी : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर आणि  रायगडमधील सुकेळी घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला. काही काळ मुंबई महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु होती. दरड बाजुला केल्यानंतर वाहतूक पूर्वत झाली. दरम्यान, येत्या 48 मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत होता. संगमेश्वर बस स्थानकाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळलीय. त्यामुळं मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ही दरड हटवण्याचं काम तात्काळ हाती घेण्यात आलं. दरडीमुळे झाड रस्त्यावर कोसळले होते.

दरम्यान, देवरुख बाजारपेठे मोठा वृक्ष कोसळल्यामुळे चार दुकानांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये चार गाड्यांचे आणि एका रिक्षाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. रत्नागिरी शहरात सखल भागात पाणी साचले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. तसेच वारेही होते.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 40 टक्‍के कामे पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. हवामान विभागाने पुढील 48 तासांत अतिवृष्टीचे संकेत दिले आहेत. जिल्ह्यात बुधवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत 38.47 मिमी इतका सरासरी पाऊस झाला, तर आतापर्यंत 448.02 मिमी इतकी नोंद झाली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या संदेशानुसार पुढील 48 तासांत 12 ते 24 सेंमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. अतिवृष्टीच्या शक्‍यतेने नागरिकांना सावधानतेच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.