शशी थरूर यांची काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
काँग्रेस नेते शशी थरूर यांची काँग्रेसच्या प्रवक्तापदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदींचं केलेलं कौतुक आणि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू यामुळं थरूर अडचणीत सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Oct 13, 2014, 02:55 PM ISTसुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे, डॉक्टर्सचा नवा रिपोर्ट
माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. सुनंदाच्या मृत्यूची चौकशी करत असलेली एम्सच्या डॉक्टरांच्या टीमनं मोठा खुलासा केलाय. रिपोर्टमध्ये सुनंदाच्या मृत्यूचं कारण विष सांगितलं गेलंय.
Oct 10, 2014, 09:40 AM IST'थरुर-तरार यांचे बीबीएम मॅसेज सुनंदाला मिळवायचे होते'
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात ज्येष्ठ महिला पत्रकार नलिनी सिंह यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय.
Jul 3, 2014, 06:54 PM ISTसुनंदा मृत्यू प्रकरण: आरोग्य मंत्र्यांनी मागवला रिपोर्ट
माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ हळुहळू उकलतांना दिसतंय. एकीकडे शशि थरूर यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिलाय. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी पुष्कर यांचा पोस्टमार्टेम बाबतचा एम्सचा रिपोर्ट मागवलाय.
Jul 2, 2014, 12:50 PM ISTसुनंदा पुष्करचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव- डॉ. सुधीर गुप्ता
माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झालाय. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)चे फॉरेंसिक विभागाचे हेड सुधीर गुप्ता यांनी आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार केलीय की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला सामान्य दाखविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. गुप्ता यांनी केंद्रीय प्रशासकीय ट्रिब्यूनल (सीएटी)कडेही याबाबत तक्रार केलीय.
Jul 2, 2014, 08:56 AM ISTसुनंदा पुष्कर यांची हत्या? तपासात प्रगती नाही
केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कुठलीही प्रगती झालेली नाही. व्हिसेरा अहवालात त्यांनी औषधाचं अतिसेवन केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, या अहवालातील नोंदी या गुन्हा नोंदवण्यासाठी पुरेशा नसल्याचं म्हटलं आहे.
Mar 24, 2014, 08:42 AM ISTशशि थरुर यांची संपत्ती... फक्त २३ करोड!
केंद्रीय मंत्री शशि थरुर यांनी आपली संपत्ती जवळजवळ २३ करोड रुपये असल्याचं घोषित केलंय.
Mar 19, 2014, 10:03 AM IST`नाक दाबून सुनंदा पुष्कर यांच्या तोंडात विष ओतलं`
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुनंदा यांचा मृत्यू ही `हत्या` होती असं म्हटलंय.
Feb 24, 2014, 12:55 PM ISTसुनंदाच्या दोन्ही हातांवर चावण्याच्या खूणा, फॉरेन्सिकचा रिपोर्ट
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीय. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असलेली माहिती म्हणजे सुनंदाच्या दोन्ही हातांवर अनेक जखमा असून चावा घेतल्याचीही खूण आहे.
Jan 23, 2014, 11:48 AM IST`शशी थरुर माझ्या आईचा जीव घेऊ शकत नाहीत`
सुनंदा पुष्कर यांचा मुलगा शिव मेनन यानं दिलेल्या माहितीत, `आपली आई (सुनंदा पुष्कर) खूप धैर्यशील महिला होती. ती कधीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकत नाही` असं म्हटलंय.
Jan 22, 2014, 09:58 AM ISTसुनंदा पुष्करांच्या नावावर १०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती...
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्करच्या नावावर १०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती होती. आयपीएल २०१० मध्ये कोची टस्कर संघासाठी ७० कोटीची भागिदारी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सोडावी लागली होती. त्यावेळी शशी थरूरांनी ७० कोटी जमवल्याचा आरोप झाला होता.
Jan 21, 2014, 08:51 PM ISTसुनंदा पुष्कर यांचा मृत्यू संशयास्पद
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा थरूर यांचा मृत्यू, विषबाधेमुळे झाला असल्याचं एसडीएम रिपोर्टमध्ये म्हटलंय. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या या दिशेने तपास करणे गरजेचे असल्याचं जिल्हा सत्र न्यायाधीश अलोक शर्मा यांनी म्हटलं आहे.
Jan 21, 2014, 05:43 PM ISTओव्हर डोसमुळे सुनंदाचा मृत्यू, शरीरावर १२ जखमा – रिपोर्ट
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची पोस्टमार्टम रिपोर्ट एम्सच्या डॉक्टरांना आज एसडीएम पोलिसांकडे सोपवली आहे. एसडीएम सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी करीत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सुनंदाचा मृत्यू हा औषधांच्या ओव्हरडोसने झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Jan 20, 2014, 07:25 PM ISTपत्नी सुनंदाच्या मृत्यूबाबत शशी थरूर यांनी नोंदवला जबाब
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी गूढ कायमच आहे. याप्रकरणी सुनंदा यांचे पती आणि केंद्रीय मंत्री शशी थरुर यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. संध्याकाळच्या सुमारास थरुर एसडीएम ऑफिसमध्ये पोहचले. यावेळी एसडीएमनं सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी थरुर यांचा जबाब नोंदवून घेतला.
Jan 20, 2014, 08:04 AM ISTमृत्यूचं गूढ: मृत्यूपूर्वी सुनंदा आणि शशी थरूरमध्ये झालं होतं भांडण
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. नवनवे खुलासे समोर येतायेत. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा धक्कादायक खुलासा डॉक्टरांनी पोस्ट मॉर्टमनंतर केलेला असतानाच, या प्रकरणाचा गुंता आणखी वाढवणारी आणि भुवया उंचावणारी माहिती समोर आलीय. काही दिवसांपूर्वीच, थरूर आणि सुनंदा यांच्यात १५ जानेवारीला विमानातच जोरदार भांडण झाल्याचं समोर आलंय.
Jan 19, 2014, 12:42 PM IST