नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ हळुहळू उकलतांना दिसतंय. एकीकडे शशि थरूर यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिलाय. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी पुष्कर यांचा पोस्टमार्टेम बाबतचा एम्सचा रिपोर्ट मागवलाय.
या दरम्यान, भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामींनी सांगितलं की, ही नवी माहिती पुढे आल्याचं काही आश्चर्य वाटत नाही. सुनंदा यांची हत्या खूपच प्रोफेशनली केली गेलीय. या प्रकरणाची विस्तारानं चौकशी होणं गरजेचं आहे.
याप्रकरणी शशि थरूर यांनी काहीही बोलण्यास नकार देत म्हटलंय, सध्या पोलीस तपास सुरू आहे. एम्सचे फॉरेंसिक विभागाचे हेड डॉ. सुधीर गुप्ता यांनी सुनंदा पुष्कर यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी थरूर यांनी दबाव टाकल्याचा आरोप केलाय.
आपल्याला सुधीर गुप्ता यांचं पत्र मिळाल्याचं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसंच एम्सकडून प्रकरणाचा विस्तृत रिपोर्ट मागितलाय. सुधीर गुप्ता यांनी याप्रकरणी पंतप्रधानांनाही पत्र लिहिलंय.
पाहा काय आहे रिपोर्टमध्ये -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.