www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी गूढ कायमच आहे. याप्रकरणी सुनंदा यांचे पती आणि केंद्रीय मंत्री शशी थरुर यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. संध्याकाळच्या सुमारास थरुर एसडीएम ऑफिसमध्ये पोहचले. यावेळी एसडीएमनं सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी थरुर यांचा जबाब नोंदवून घेतला.
जवळपास एक तास थरुर यांची ही चौकशी सुरु होती. यावेळी थरुर यांचे काही नातेवाईक त्यांच्यासोबत होते. दक्षिण-पश्चिम दिल्लीतील सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रे आलोक शर्मा यांच्या कार्यालयात जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ शशी थरूर यांची चौकशी करण्यात आली. सुनंदा यांच्या मृत्यूपूर्वी घटनाक्रमाची माहिती शशी थरूर यांनी दिल्याचं समजतंय.
शुक्रवारी रात्री ५२ वर्षीय सुनंदा पुष्कर या हॉटेल लीला या हॉटेलच्या रुम नं. ३४५मध्ये मृतावस्थेत आढळल्या. दोन दिवसांपासून पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यासोबतच्या संबंधांवरुन सुनंदा आणि शशी थरूर यांच्यात वाद सुरू होते.
या चौकशीनंतर शशी थरूर यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पत्र लिहून सुनंदा यांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत विशेष मदत करण्याची विनंती केलीय. लवकरात लवकर सुनंदा यांच्या मृत्यूचा तपास करण्याची मागणी त्यांनी केलीय.
दरम्यान, त्यापूर्वी पत्रकार नलिनी सिंह यांचा जबाब नोंदवून घेण्याची शक्यता आहे. सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूपूर्वी फोनवरुन संपर्क साधल्याचा दावा नलिनी सिंह यांनी केला होता. यावेळी सुनंदा तणावात होत्या. त्यांनी आपलं दुःख फोनवरुन सांगितल्याचं नलिनी सिंह यांनी म्हटलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.