शिंदेंची कोलांटीउडी, म्हणे मी `हिंदू` म्हटलंच नव्हतं!
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या विधानावर चक्क कोलांटउडी मारली आहे. एआयसीसी बैठकीतल्या भाषणात बोलताना त्यांनी `हिंदू` हा शब्द स्पष्टपणे वापरला होता. मात्र नंतर पत्रकारांशी बोलताना आपण `सॅफ्रॉन` म्हणालो, ‘हिंदू’ म्हणालोच नाही असं सांगत घूमजाव केलं.
Jan 20, 2013, 04:31 PM ISTभाजपचे कॅम्प हिंदू दहशतवाद्यांसाठी - सुशीलकुमार शिंदे
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालविण्यात येणारे कॅम्प हे हिंदू दहशतवाद्यांसाठीच असल्याचे, वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे केले. दरम्यान, काँग्रेसने माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा हल्ला भाजपने चढविला आहे.
Jan 20, 2013, 03:10 PM ISTतालिबान आणि संघाची विचारसरणी समान- दिग्विजय सिंग
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांच्या मते तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारसरणीत फारसा फरक नाही. तालिबान आणि रा.स्व.सं. एकसारखेच असल्याचं वक्तव्य दिग्विजय सिंग यांनी केलं आहे.
Jan 8, 2013, 05:30 PM IST`एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच विवाहाचा करार`
एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच पती-पत्नीमध्ये लग्नाचा करार केला जातो, असं म्हणत भागवतांनी आपले विचार पाझळलेत.
Jan 8, 2013, 10:44 AM IST‘बलात्कार भारतात नाही, ‘इंडिया’त होतात’
बलात्कार `इंडियात` होतात, भारतात होत नाहीत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय.
Jan 4, 2013, 08:40 PM ISTगडकरी राजीनामा द्या – राम जेठमलानी
भाजप नेते राम जेठमलानींनी अपेक्षेप्रमाणे भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर तोफ डागलीय़. नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जेठमलानी यांनी केलीय.
Nov 6, 2012, 01:12 PM ISTगडकरींच्या पाठिशी भाजप - जावडेकर
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी हे आपल्या पदाचा राजीनामा देतील ही बातमी साफ चुकीची आणि निराधार आहे. गडकरी यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. भाजप गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिले.
Oct 26, 2012, 11:58 PM IST‘आरएसएसनं वापरला चोरीचा पैसा’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी आणि आरएसएसवर घणाघाती आरोप केले आहेत. गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना नागपुरातल्या आरएएसच्या कार्यालयाचे बांधकाम झाले आहे. त्यामुळं यासाठी आलेला पैसा हा संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Oct 25, 2012, 09:38 PM ISTनितीन गडकरी अडचणीत
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या `पूर्ती पॉवर अँड शुगर`मधल्या घोटाळ्यांबद्दल केजरीवाल यांनी आवाज उठवल्यामुळे गडकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.
Oct 24, 2012, 02:26 PM ISTमोदी पंतप्रधानपदाच्या दावेदारीतून बाहेर
२०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी सध्यातरी नाकारण्यात आली आहे. भाजपमधील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांनी विचार विनिमय केल्यावर हा निर्णय घेतला आहे.
Oct 23, 2012, 02:07 PM ISTमोदी-भागवत भेटीचं गुपित काय?
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अचानक नागपूरात येऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा एक मोठा चर्चेचा विषय ठरलाय.
Oct 21, 2012, 04:59 PM ISTदलितही होऊ शकतो सरसंघचालक- भागवत
मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं, की रा.स्व.सं.च्या सरसंघचालकपदी विराजमान होऊ शकतो. कार्य करणारा कुठलाही स्वयंसेवक सरसंघचालक होऊ शकतो, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे. मात्र, केवळ दलित आहे, या आधारावर सरसंघचालक होऊ शकत नाही., त्याचं कार्यही तितकंच हवं.
Sep 5, 2012, 12:31 PM IST'आरएसएस' म्हणजे रुरल स्वदेशी संडास- दिग्विजय सिंग
आपल्या वाचाळतेसाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून वाद ओढावून घेतलाय. दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना गावठी संडासाशी केली आहे. देशाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शौचालयांची गरज असल्याचं सांगत दिग्गीराजांनी यावर कडी करत शौचालयांना `रुरल स्वदेशी संडास` म्हणजेच `आरएसएस` हे नाव द्यावं अशी सूचना दिली आहे.
Aug 24, 2012, 11:25 PM ISTसरकारची मुस्कटदाबी, संघासह २० खाती बंद!
सरकारने राष्ट्राच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत ट्विटरवरील २० खाती बंद केली आहेत. पूर्वोत्तर राज्यांतील नागरिकांच्या विरुद्ध पसरणाऱ्या अफवा रोखण्याच्या नावाखाली सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र पांचजन्य, प्रविण तोगडीया आणि नरेंद्र मोदींचंही अकाऊंट ब्लॉक केलं आहे.
Aug 24, 2012, 05:47 PM ISTट्विटर बंद, भडकले मोदी, लावला काळा फोटो
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधींपासून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे ट्विटर खाते केंद्र सरकारने बंद केले आहे. सुरक्षा आणि घृणा पसरवित असल्यावर प्रतिबंध घालण्याच्या कारण देत केंद्र सरकारतर्फे या ट्विटर बंद करण्यात आले आहे.
Aug 24, 2012, 05:46 PM IST