`एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच विवाहाचा करार`

एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच पती-पत्नीमध्ये लग्नाचा करार केला जातो, असं म्हणत भागवतांनी आपले विचार पाझळलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 8, 2013, 10:51 AM IST

www.24taas.com, इंदौर
‘बलात्कार भारतात नाही तर इंडियात होतात’ असं वादग्रस्त वक्तव्य उडवून देणाऱ्या आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी आता आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच पती-पत्नीमध्ये लग्नाचा करार केला जातो, असं म्हणत भागवतांनी आपले विचार पाझळलेत.
‘लग्नाच्या करारानुसार पती आणि पत्नी एकमेकांच्या गरजा पूर्ण करीत असतात. काही कारणांमुळे हा करार पूर्ण न झाल्यास पती पत्नीला किंवा पत्नी पतीला काडीमोड देते. आपण ज्या लग्नाला संस्कार म्हणतो तो एक करार असतो. या करारानुसार तू माझे घर सांभाळ, मला सुख दे... त्याबदल्यात मी तुझ्या पोटापाण्याची आणि सुरक्षेची व्यवस्था करतो, याच आधारावर पतीपत्नीचा संसार चाललेला असतो ’ असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय.

महिलांचे काम घर संभाळण्याचे आणि पुरुषांचे काम पैसे कमाविण्याचं आणि महिलांचे संरक्षण करण्याचं असल्याचं सांगत भागवत म्हणाले, हाच सामजिक नियम आहे आणि यामध्ये पती-पत्नी बांधले गेलेत. भागवतांच्या या वक्तव्याचा विविध क्षेत्रांतून निषेधाचा सूर उमटतोय.