rinku rajguru

अजय-अतुलच्या कुटुंबातील मुलांचाही झिंगाट डान्स...

सुप्रसिद्ध संगीतकार आणि सैराट या चित्रपटामुळे सर्वांना झिंगाट करणारे अजय-अतुल यांच्या कुटुंबामधील लहान मुलांनाही या गाण्याने वेड लावलं आहे. 

Jun 27, 2016, 06:07 PM IST

'सैराट'मुळे कपिल शर्मा ठरला नंबर - १

नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमाचं फिव्हर अजूनही कमी होतांना दिसत नाही आहे.  सैराटने सिनेप्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. आजही सैराट सिनेमाचे कलाकारांना पाहण्यासाठी लोकं मोठी गर्दी करत आहेत. सैराटचं यश इतकं मोठं होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याची दखल घेतली गेली. सैराटची टीम पहिल्यांदाच हिंदी शोमध्ये झळकले आणि त्यामुळे हिंदी शोजला ही तुफान प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.

Jun 23, 2016, 07:33 PM IST

'सैराट'मधील आर्ची अर्थात प्रत्यक्षात रिंकू पाहा कशी आहे?

पडद्यावरील आर्ची तुम्ही पाहिलीत. मात्र, प्रत्यक्ष जीवनात ती कशी आहे, हे तुम्हाला माहित आहे का?

Jun 23, 2016, 11:13 AM IST

सैराट आता लंडनमध्येही रिलीज होणार

देशभरातून पसंतीची पावती मिळवणारा सैराट आता लंडनमध्येही रिलीज होणार आहे. दुबई, अमेरिकेतील प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी आर्ची-परश्याची जोडीची कहाणी आता लंडनच्या नागरिकांना पाहायला मिळणार आहे. 

Jun 23, 2016, 10:48 AM IST

महिलांना आर्चीच्या साडीने याड लावलं

 'सैराट' मराठी सिनेमा रिलीज झाल्यानंतर आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने प्रत्येकाच्या मनात घर केले. आर्ची-परशा जोडीला तरुणाईने डोक्यावर घेतलं. आता तर महिलांना आर्चीच्या साडीने याड लावलंय. या साडीचे क्रेझ वाढत असून सोशल मीडियावर आर्चीचे छायाचित्र किनार असलेल्या साडीचा फोटो व्हायरल होत आहे.

Jun 23, 2016, 10:04 AM IST

रिंकू राजगुरु शाळेत, पाहण्यासाठी वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांची गर्दी

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही दहावीत गेली तरी ती शाळेत हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शाळेने तिला तंबी दिली होती. त्यानंतर रिंकू राजगुरु मंगळवारी शाळेत हजर झाली.

Jun 22, 2016, 11:00 AM IST

सैराट फेम रिंकू राजगुरुला शाळेचा इशारा

सैराट फेम रिंकू राजगुरु सध्या महाराष्ट्रात चांगलीच गाजली आहे. महाराष्ट्रात रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी आजही चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. सध्या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आणि विविध शोमध्ये हजेरी लावते आहे. पण रिंकूचं हे दहावीचं वर्ष आहे. शाळा सुरु झाल्या आहेत पण रिंकू ही अजूनही शाळेत आलेली नाही.

Jun 20, 2016, 08:31 PM IST

आणखी एका हिंदी शोमध्ये 'सैराट'चा झिंगाट

'द कपिल शर्मा शो'नंतर आणखी एका हिंदी शोमध्ये सैराट सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर झळकले.

Jun 20, 2016, 04:36 PM IST

डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर रंगला कुस्तीचा फड

सैराट चित्रपटाची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता आता हिंदी शोमध्येही सैराटच्या टीम निमंत्रणं मिळू लागलीत.

Jun 18, 2016, 12:28 PM IST

परशा झाला देवदास तर आर्ची चंद्रमुखी

सैराटची टीम 'द कपिल शर्मा' शो नंतर आता एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहेत.

Jun 17, 2016, 07:02 PM IST

कपिल शर्माचा सैराट एपिसोड यूट्यूबवर नंबर वन

सध्या सर्वत्र सैराटचीच जोरदार हवा आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर ८५ हून अधिक कोटींचा गल्लाच जमवला नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडीत काढले. 

Jun 16, 2016, 12:48 PM IST

'सैराट' सिनेमाची नायिका रिंकूला काय आवडते?

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या सिनेमाने मराठीत इतिहास नोंदवलाय. या सिनेमा अफाट यश मिळालेय. कमाईत ८५ कोटींचा टप्पा पार केलाय. सध्या या सिनेमाची टीम सक्सेस पार्टीत मग्न आहे. तर ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरु नुकतीच आपल्या गावी अकलूजला गेली. तिथे तिचे जंगी स्वागत झाले.

Jun 14, 2016, 08:10 PM IST

सैराटच्या विक्रमी यशाबद्दल आर्ची-परश्याची प्रतिक्रिया

संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणारा सैराटने नुकताच बॉक्स ऑफिसवर ८५ कोटींचा टप्पा पार केला. 

Jun 13, 2016, 01:11 PM IST

सैराटची सक्सेस पार्टी

मराठी सिनेविश्वास न भूतो न भविष्यति अशी कामगिरी सैराट चित्रपटाने केलीये. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने मराठी चित्रपटविश्वातील कमाईचा सर्वोच्च आकडा गाठलाय. यापूर्वी एकाही मराठी चित्रपटाला ही कामगिरी करता आली नव्हती. या सिनेमाने तब्बल ८५ कोटीहून अधिक कोटींची कमाई केलीये. अद्यापही अनेक थिएटर्समध्ये या सिनेमाचे शोज सुरु आहेत. 

Jun 12, 2016, 09:34 AM IST