सैराटमध्ये चिठ्ठी पोहोचवणारा चिमुकला सत्कार सोहळ्यात

सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यति असा इतिहास रचला. मराठी सिनेसृष्टीतील कमाईचे सर्व रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले.

Updated: Jul 1, 2016, 12:03 PM IST
सैराटमध्ये चिठ्ठी पोहोचवणारा चिमुकला सत्कार सोहळ्यात title=

मुंबई : सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यति असा इतिहास रचला. मराठी सिनेसृष्टीतील कमाईचे सर्व रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले.

सैराटच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. नुकतीच सैराटची संपूर्ण टीम करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी आली होती. तेथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित कऱण्यात आला होता. 

या सोहळ्यासाठी नागराज मंजुळे, आकाश ठोसर, रिंकू राजगुरु, अरबाज शेख, तानाजी गळगुंडे, सुरेश विश्वकर्मा, सूरज पवार, धनंजय ननवरे उपस्थित होते. यावेळी आर्चीला चिठ्ठी पोहोचवणारा तो चिमुकलाही तेथे होता. 

वर्धन चवरे असं या चिमुकल्याचं नाव आहे. यावेळी आकाशसोबत तो व्यासपीठावर बसला होता. जेऊर तालुक्यात मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. सैराटमधील सर्वच कलाकारांची एक छबी टिपण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.