मुंबई : सैराटची टीम 'द कपिल शर्मा' शो नंतर आता एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहेत. मराठी प्रेक्षकांना वेड लावल्यानंतर हिंदी रिअॅलिटी शोंना देखील सैराटचं 'याडं लागलंय'.
कपिल शर्मानंतर ही जोडी आता बॉलिवूडच्या धक धक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षितसोबत ठुमके लावतांना आपल्याला पाहायला मिळेल. ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये आकाश आणि रिंकू दिसणार आहेत.
या एपिसोडचे शुटिंग झाले असून येत्या शनिवारी आणि रविवारी हा एपिसोड रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांना पहायला मिळणारे. ‘अॅण्ड टीव्ही’ वरील या रिअॅलिटी शोमध्ये रिंकू आणि आकाशने अक्षरश: धूडगुस घातलाय. ‘सैराट’च्या संवादांसोबतच त्यांनी माधुरी दीक्षितच्या ‘देवदास’ चित्रपटातीलही संवाद बोलून दाखविले.
याचाच एक प्रोमो रिलीज करण्यात आला असून, यात रिंकू आकाशला म्हणते, ‘क्यू पिते हो जब बर्दाश नही होती ‘ त्यावर आकाश म्हणतो, ‘इसलिए पिता हू ताकी तुम्हे बर्दाश कर सकू’.
Don't miss the Sairat performance of Rinkoo Rajguru & Akash Thosar on #SYTYCD, Sat-Sun, 8.30 pm, only on &TV pic.twitter.com/6g0Cd24N0v
— &TV (@AndTVOfficial) June 16, 2016
फक्त सैराटची टीमच नाहीतर अगदी स्पर्धकांनीही याड लागलं गं आणि सैराट झालं जी या सैराटच्या गाण्यावर डान्स केला.