डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर रंगला कुस्तीचा फड

सैराट चित्रपटाची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता आता हिंदी शोमध्येही सैराटच्या टीम निमंत्रणं मिळू लागलीत.

Updated: Jun 18, 2016, 12:29 PM IST
डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर रंगला कुस्तीचा फड title=

मुंबई : सैराट चित्रपटाची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता आता हिंदी शोमध्येही सैराटच्या टीम निमंत्रणं मिळू लागलीत.

काही दिवसांपूर्वी सैराटची टीम कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये दिसली होती. त्यानंतर सो यू थिंक यू कॅन डान्स या डान्स रिअॅलिटी शोमध्येही रिंकू आणि आकाश यांनी हजेरी लावली.

यावेळी सेटवर सैराटमय वातावरण झाले होते. सैराटच्या गाण्यावर सर्वांनी डान्स केलाच मात्र यावेळी आकाशचे वेगळे रुप पाहायला मिळाले. चित्रपटात येण्याआधी आकाश कुस्ती खेळत असे. कुस्तीपटू आकाश यावेळी सेटवर पाहायला मिळाला. हा रिअॅलिटी शो होस्ट करणाऱ्यासोबत आकाश कुस्ती खेळला.