ratan tata

‎'राज-रतन' भेट, विकासाचा बेत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांची भेट घेतलीये.. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या भेटीला महत्त्व आल्याचं बोललं जातंय.. मनसेने मुंबईच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार केलीय, याबाबतच उद्योंगपतींचा कल जाणून घेण्यासाठी ही भेट घेतल्याचं बोललं जातंय.

Dec 17, 2011, 10:49 AM IST

सायरस मिस्त्री रतन टाटांचे वारसदार

रतन टाटांनी अवघ्या ४३ वर्षांच्या सायरस मिस्त्रींची निवड आपला वारसदार म्हणून केली आहे. सायरस मिस्त्रींची टाटा सन्सच्या डेप्युटी चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सायरस मिस्त्री रतन टाटांसमवेत एक वर्ष काम करणार आहेत. रतन टाटा निवृत्त झाल्यानंतर डिसेंबर २०१२ मध्ये टाटा सन्सची धुरा सांभाळतील. टाटा सन्स ही टाटा साम्राज्यातल्या सर्व कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. टाटा सन्सचा अध्यक्ष हा टाटा साम्राज्याचा अधिपती असतो.

Nov 23, 2011, 02:31 PM IST