माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी शोकाकुळ, 'या' कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

Manmohan Singh passes away: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे टी. व्ही. आणि सिनेजगत सुध्दा शोकाकुळ झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 

Updated: Dec 27, 2024, 03:28 PM IST
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी शोकाकुळ, 'या' कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली title=
(photo-credited to social media)

Manmohan Singh passes away:  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील AIMS रुग्णालयात 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते बऱ्याच काळापासून आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच टी. व्ही. आणि सिनेजगतातील दिग्गजांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यात मोठे योगदान आहे.

अभिनेता सनी देओलने त्याच्या X(ट्वीटर) अकाउंटवरून मनमोहन सिंह यांना भावपूर्ण संदेश शेअर करत लिहिलं आहे की 'मी मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःखी आहे. ते एक दूरदर्शी नेता होते, भारताच्या उदारीकरणाला आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांची बुद्धिमत्ता, प्रामाणिकता, राष्ट्राच्या विकासासाठीचं योगदान अविस्मरणीय आहे. माझ्या मनःपूर्वक संवेदना.'
 

अभिनेत्री निमरत कौरने भावनिक संदेश लिहिला आहे की 'डॉ. मनमोहन सिंग एक विद्वान राजनेता, भारतातील आर्थिक सुधारांचे शिल्पकार आहेत. त्यांच्या अद्वितीय बुद्धिमत्तेने आणि विनम्रतेने राष्ट्रावर अमीट ठसा उमठवला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आत्म्याला शांती लाभो. सतनाम वाहे गुरु.'

चित्रपट निर्माता मधुर भंडारकर भावपूर्वक आदरांजली देत म्हणाले की, 'डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन म्हणजे एका युगाचा अंत आहे. ते भारताच्या आर्थिक सुधारणेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या सामाजिक समर्पणाने आधुनिक भारताला आकार दिला आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि प्रशंसकांना माझ्या मनःपूर्वक संवेदना."

अभिनेत्री जेनेलिया देशमुखने भावुक श्रद्धांजली लिहिली की "आपल्या भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप दुःख झालं. ते भारतासाठी प्रामाणिकता, ज्ञान आणि निस्वार्थ सेवेचा वारसा सोडून गेले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

रवि किशन यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करत सांगितले "डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी कळली. प्रभू श्री रामने या पुण्यवान आत्म्याला त्यांच्या श्री चरणी स्थान द्यावे ही विनंती. ॐ शांति."

अभिनेता रितेश देशमुखने वडिल 'विलासराव देशमुख' यांचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबतचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले की 'आज आपण भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान गमावला आहे. ज्या व्यक्तीने भारताच्या आर्थिक विकासाला चालना दिली. ते प्रतिष्ठेचे आणि नम्रतेचे प्रतीक होते. त्यांच्या वारशाचे आम्ही सदैव ऋणी राहू. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'

मनोज वाजपेयी यांनी खेद व्यक्त करत सांगितले की "आपल्या माजी पंतप्रधानांच्या निधनाने दु:ख झाले. ते एक असे राजकारणी होते ज्यांनी आपल्या देशातील विकासाच्या प्रत्येक पैलूमध्ये दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना."
 

कपिल शर्मानेही त्याच्या x (ट्विटर) अकाउंटवर डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी एका मुलाखतीचे फोटो शेअर केले आणि लिहिले की "आज आपण भारतातील एक उत्कृष्ट नेता गमावला आहे. भारताच्या आर्थिक सुधारांचे निर्माता, प्रामाणिकता आणि विनम्रतेचे प्रतीक डॉ. मनमोहन सिंग ह हे आपल्यासाठी प्रगती आणि आशेचा वारसा सोडून गेले.