बाळासाहेब ठाकरे उतरणार मैदानात
निवडणुकीत स्टार प्रचारक उतरण्यावर भरही दिला जात आहे. मनसेने राज ठाकरेंच्या 'होम मिनिस्टर'ना मैदानात उतरविले आहे. आता तर शिवसेनेने ठाणे, मुंबईत सत्ता राखण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मैदानात आणण्याचे ठरविले आहे.
Jan 13, 2012, 05:09 PM ISTराज ठाकरेंवर कारवाई झाली पाहिजे - नितीश कुमार
महाराष्ठ्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युपी, बिहारमधील लोकांवर परप्रांतियांच्या विषयावरून टीका केल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकां यामुळे अशा प्रकारची प्रक्षोभक भाषण केले जात आहे.
Jan 12, 2012, 12:29 PM ISTराज ठाकरेंवर उद्धव यांचे तोंडसुख
मुंबईत बंडखोरीचं निशाण नको, असं भावनिक आवाहन शिवसैनिकांना करत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांच्या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुकलं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले.
Jan 11, 2012, 11:37 AM ISTराज यांनी दिला मुंबई हायकोर्टालाच सल्ला
मी प्रत्येक वेळी मराठीच्या मुद्यावर बोलतं आलो पण मला चुकीचं ठरवत माझ्यावर टीका केली गेली आता गुजरात हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यांच्याकडून मुंबई हायकोर्टाने काहीतरी शिकावे असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी चक्क मुंबई हायकोर्टाला दिला आहे. राज ठाकरे औरंगाबादमध्ये बोलत होते.
Jan 3, 2012, 11:18 AM ISTराज ठाकरे - सरसंघचालक यांची भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची सदिच्छा भेट घेतली.
Dec 30, 2011, 05:30 PM ISTराज यांचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे- उद्धव
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरेंचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे. शिवसेना सीमावासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज यांची भूमिका म्हणजे सीमावासियांची क्रूर थट्टा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सीमावासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली तेंव्हा मराठी माणसाला मान सन्मान मिळत असेल तर कर्नाटकात राहयला काय हरकत आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होते.
Dec 22, 2011, 08:05 PM ISTमराठी हृदयसम्राटांची मराठी माणसाप्रति संवेदनशुन्यता
झी २४ तास वेब टीम, मुंबई
Dec 20, 2011, 10:28 AM IST
भटके मतदार कसे - राज ठाकरे
मुंबईतील भटके मतदार कसे होऊ शकतात. त्यांची नावे मतदार यादीत नकोत, असे राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगताच आपल्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासन निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.
Dec 2, 2011, 08:11 AM ISTखा.परांजपेंची राज ठाकरेंनी केली कोंडी
शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे मनसेत यायला उत्सुक होते, या मनसे आमदार राम कदम यांच्या गौप्यस्फोटाला राज ठाकरेंनीही दुजोरा दिलाय.
Nov 23, 2011, 06:06 AM ISTराज ठाकरेंची बोचरी टिका
शरद पवारांचे सासरे अजित पवारांचे आजोबा कसे काय होऊ शकतात अशी खास राज ठाकरे शैलीतली टिका राज ठाकरेंनी केली. शरद पवारांचे सासरे रणजी क्रिकेटपटू होते आणि ते आपले आजोबा होते असं विधान अजित पवारांनी केलं होतं.
Nov 22, 2011, 03:43 PM ISTपरप्रांतियांना सत्ताधारी गोंजारत आहेत - राज
कापूस उत्पादक शेतकरी तडफडतो आहे. परप्रांतियांना तुम्ही गोंजारता. मराठी माणूस प्रश्नांसाठी रस्त्यावर आला की काठय़ा मारता, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथे केली.
Nov 21, 2011, 03:05 AM ISTराज ठाकरे यांची दिवाळीनंतर ‘फटाकेबाजी’!
काही फटाके दिवाळीनंतरही बाकी ठेवायचे असतात, असे सांगत दिवाळीला भाष्य करणं राज ठाकरेंनी टाळलं होतं. मात्र, आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन संजय निरूपम, कृपाशंकर सिंह, उद्धव ठाकरे, उत्तर भारतीय, हिंदी मीडियांचा चांगलाच समाचार घेतला.
Nov 3, 2011, 01:49 PM ISTराज यांचा पत्रकारितेचा क्लास, पाहा झी २४ तास
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी झी २४ तासच्या सर्व विभागांना भेट देत तिथे चालणाऱ्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. प्रत्येक विभागाचे काम कसे चालते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात या संबंधीच्या तपशीलात त्यांना रस होता.
Oct 27, 2011, 11:26 AM ISTमहाराष्ट्राचे ग्रह फिरले आहेत!
राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि त्यास प्रशासनाची साथ असल्यास राज्यात काय होऊ शकते याचे गुजरात हे आदर्श उदाहरण ठरावे , असे राज म्हणाले
Oct 9, 2011, 12:17 PM IST