pm narendra modi

नवाज शरीफांच्या सल्लागारांनी केलं मोदींचं कौतूक

पीएम मोदींबाबत पाकिस्तानातील टॉप लीडर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या दोन सल्लागारांनी मोदींबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Oct 9, 2016, 09:28 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये साजरा करणार दसरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा लखनऊमध्ये दसरा साजरा करणार आहेत. पंतप्रधान ११ ऑक्टोबरला लखनऊमध्ये उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान ऐशबागच्या विश्व प्रसिद्ध रामलीलामध्ये देखील सहभागी होणार आहेत. रावण दहनच्या कार्यक्रमासाठीही पंतप्रधान उपस्खित राहणार आहे.

Oct 4, 2016, 11:43 AM IST

अजित डोवाल यांनी घेतली मोदींची भेट, परिस्थितीची दिली माहिती

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन एलओसीवरील परिस्थितीचा माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांना सर्जिकल स्ट्राइकनंतरच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी दिला. सूत्रांच्या माहितीनुसार डोवाल यांनी म्हटलं की, सीमेवर पाकिस्तानी सेनेकडून हालचाली वाढल्या आहे.

Oct 3, 2016, 12:55 PM IST

पहिल्यांदा राहुल गांधींनी पंतप्रधानांचे केले कौतुक

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलेय. 

Sep 30, 2016, 02:28 PM IST

सर्जिकल स्ट्राईकनंतर नेटिझन्सची सोशल मीडियावर चर्चा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय सेनेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. 

Sep 30, 2016, 10:28 AM IST

भारतीय लष्कराचं आणि पंतप्रधानाचं मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आम्ही पूर्णपणे हाय अलर्टवर असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आवश्यक त्या खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 

Sep 29, 2016, 06:19 PM IST

पाकिस्तानच्या 'दर्जा'बाबत आज फैसला, नरेंद्र मोदींच्या उपस्थित बैठक

भारतानं पाकिस्तानला दिलेल्या विशेष मित्र राष्ट्राचा दर्जाचा पुनर्विचार करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली आहे.

Sep 29, 2016, 08:16 AM IST

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधले महत्त्वाचे मुद्दे

पीएम नरेंद्र मोदी यांनी आज 24 व्या मन की बातमधून देशवासियांना रेडिओच्या माध्यमातून संबोधित केलं. पंतप्रधानांनी सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, दोषींना शिक्षा होणारच.

Sep 25, 2016, 01:31 PM IST

पंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही दलांच्या प्रमुखांची भेट

उरीवरील  दहशतवादी हल्ल्यानंतर  पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या तयारीर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांची भेट घेतली. 

Sep 24, 2016, 02:59 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉररुममध्ये घालवले 2 तास

उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय गुप्त बैठक घेतली. वॉर रूममध्ये जवळपास 2 तास ही बैठक चालली. पाकिस्तानला कसं हाताळता येईल याबाबतची योजना आखण्यात आली. साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीची माहिती पडल्यानंतर पाकिस्तान बैचेन झाला. जेव्हा युद्धाची परिस्थिती येते तेव्हा वॉर रुममध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

Sep 22, 2016, 10:06 PM IST