नवाज शरीफांच्या सल्लागारांनी केलं मोदींचं कौतूक

पीएम मोदींबाबत पाकिस्तानातील टॉप लीडर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या दोन सल्लागारांनी मोदींबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Updated: Oct 9, 2016, 09:28 PM IST
नवाज शरीफांच्या सल्लागारांनी केलं मोदींचं कौतूक title=

नवी दिल्ली : पीएम मोदींबाबत पाकिस्तानातील टॉप लीडर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या दोन सल्लागारांनी मोदींबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
शरीफ यांचे परराष्ट्र खात्याचे सल्लागार सरताज अजीज म्हणतात की, 'जो पर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधात कधीच सुधार होणार नाही. तर काश्मीरच्या मुद्द्यावर सल्लागार मुशाहिद हुसैन सैयद म्हणतात की, मोदी हे मीतभाषी व्यक्ती आहेत. ते कधीही युटर्न घेऊन आश्चर्याचा धक्का देऊ शकतात.'

मुशाहिद यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, 'मोदी दिल्लीसाठी बाहेरचे व्यक्ती आहे. ते दिल्लीतल्या त्या जुन्या व्यक्तींप्रमाणे नाही जे पाकिस्तानसंबंधी कोल्ड वॉरमध्ये जगतील. मला वाटतं की, इस्लामाबादमध्ये सार्क समिट नक्की होईल. मोदी नवाज शरीफ यांची गळाभेट घेऊ शकतात. मला वाटतं की मोदींना पुढे जाण्यासाठी हाच मार्ग योग्य वाटेल.

'मोदींमध्ये सरप्राइज देण्याची ताकद आहे. मला आशा आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानवर यूटर्न घेत ते दक्षिय आशियाला भेट देऊ शकतात. मोदी आणइ नवाज यांच्यामधील संबंध चांगले आहेत. मोदी देशाला युटर्नसाठी तयार करत आहेत. भारत गतीने पुढे जात आहे. एनएसजी आणि यूएन सिक्युरिटी काउंसिलच्या मेंबरशिप भारताला हवी आहे. यासाठी पाकिस्तानसोबत चांगले संबंध असणं गरजेचं आहे. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर भारत १० वर्ष मागे जाईल. आम्हाला वाटतं की  अमेरिका दोन्ही देशांना चर्चेसाठी तयार करतंय. अमेरिकेला दोन्ही देशांमध्ये तणाव नको आहे.' असं ही ते म्हणाले.