पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉररुममध्ये घालवले 2 तास

उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय गुप्त बैठक घेतली. वॉर रूममध्ये जवळपास 2 तास ही बैठक चालली. पाकिस्तानला कसं हाताळता येईल याबाबतची योजना आखण्यात आली. साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीची माहिती पडल्यानंतर पाकिस्तान बैचेन झाला. जेव्हा युद्धाची परिस्थिती येते तेव्हा वॉर रुममध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

Updated: Sep 22, 2016, 10:06 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉररुममध्ये घालवले 2 तास title=

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय गुप्त बैठक घेतली. वॉर रूममध्ये जवळपास 2 तास ही बैठक चालली. पाकिस्तानला कसं हाताळता येईल याबाबतची योजना आखण्यात आली. साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीची माहिती पडल्यानंतर पाकिस्तान बैचेन झाला. जेव्हा युद्धाची परिस्थिती येते तेव्हा वॉर रुममध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

20 सप्टेंबरला उरी हल्ल्याच्या 2 दिवसानंतर जेव्हा देशभरातून संताप व्यक्त होत होता तेव्हा उशिरा रात्रीपर्यंत या वॉररुममध्ये महत्त्वाची बैठक सुरु होती. ही बैठक जेव्हा सुरु होती तेव्हा कोणालाही या गोष्टीची कल्पना देखील नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार पीएम मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाळ, सेना प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग, वायुसेना प्रमुख अरूप राहा, नौसेना प्रमुख सुनील लांबा या बैठकीत उपस्थित होते.

देशातील सर्वात ताकतवान कंट्रोल रूममध्ये जगातील ताकतवान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व गुप्त माहिती आणि दहशतवाद्यांच्या गुप्त ठिकाणांबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे मोदी हे पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत असल्याचंच दिसतंय. मोदींच्या योजना यशस्वी होतायंत. यापुढे काय होणार हे कोणालाच माहित नाही.