Akshay Kumar Talked About AIDS : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतो. ट्रॅफिक नियमांचं पालन असो किंवा मग सॅनिटर पॅड्सविषयी जागरुकता वाढवायची असो. अक्षय कुमार नेहमीच या सगळ्यांविषयी जाहिरात करत सगळ्यांमधील जागरुकता वाढवताना दिसतो. मात्र, तुम्हाला माहितीये का की अनेक विषयांवरून जागरुकता पसरवणाऱ्या अक्षयला एक दिवस अचानक जेव्हा AIDS वर बोलण्यास सांगितलं तर त्यानं असा किस्सा सांगितला की लोकांना झालं हसू अनावर.
अक्षय कुमारनं एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की 'त्या दिवशी काय झालं होतं, तो किस्सा आठवला ही खूप हसायला येतं. शिल्मा, मी, सैफ अली खान आणि रतन जैन तिथे होतो. आम्हाला सांगितलं की आपण प्रीमियरसाठी जायला हवं. अचानक एक व्यक्ती स्टेजवर आली आणि म्हणाला, आता अक्षय जी तुम्हाला AIDS विषयी काही सांगतील. मुळात मला हेच माहित नव्हतं की हा पूर्ण प्रीमियर हा AIDS पीडितांसाठी देण्यात येणाऱ्या चॅरिटीसाठी आयोजित करण्यात आला आहे. रतन जैन यांनी आम्हाला याविषयी काही सांगितलं नाही. तिथे सैफ अली खान माझ्याकडे बघून हसत होता. त्याला कळलं होतं की मला कळत नाही आहे. अशात मी तिथे काय बोललो असेन याचा थोडा विचार करा. मी कधीच विसरू शकलो नाही की त्या दिवशी मी काय केलं होतं.'
हेही वाचा : VIDEO : राम चरणला पाहण्यासाठी पोहोचलेल्या चाहत्यांवर पोलिसांकडून मंदिरातच लाठीचार्ज
याविषयी सविस्तर सांगत अक्षय म्हणाला, अशिक्षत लोकांसारखं राहू नका, कंडोम वापरा आणि खिलाडी व्हा. हे ऐकताच सैफ अली खानला हसू अनावर झालं आणि तो पोट धरून हसू लागला. तर मी धन्यवाद म्हणतं तिथेच माझं बोलणं थांबवलं. अक्षय कुमार ज्या चित्रपटाविषयी बोलत होता तो चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैं खिलाडी तू अनाडी' या चित्रपटा दरम्यानचा होता. समीर मलखान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटात सैफ अली खान आणि अक्षय कुमार महत्त्वाच्या भूमिकेत होते. दरम्यान, अक्षय कुमार आजही स्टेजवरील हा क्षण विसरला नसेल.