pm modi

सरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 09:06 PM IST

संशयीत दहशतवाद्यांकडून बँकेत १० लाखाचा दरोडा

श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.

बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dec 8, 2016, 08:52 PM IST

नोटबंदीला एक महिना पूर्ण, पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले

Dec 8, 2016, 03:14 PM IST

या पाकिस्तानी अँकरने मोदींनी दिलीये धमकी

'आपको कितनी बार समझाया है शोलों से न खेलो जल जाओगे, बारूद से न खेलो नेस्तानाबूद हो जाओगे।' अशाच काहीशा अंदाजात बोलत असलेल्या एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलच्या अँकरचा व्हिडीओ सध्या नेटवर व्हायरल होतोय. या व्हिडीओत ती शायरीद्वारे मोदींनी धमकी देतेय. ती शायरी बोलताना तिचे हावभाव पाहून तुम्हाला हसूच अधिक येईल. ती म्हणतेय अगर हमें गुस्सा आ गया तो न मान होगा, न हनुमान होगा और ना कोई शक्तीमान. 

Dec 8, 2016, 03:10 PM IST

नोटबंदीबाबत मोदींना मागावी माफी...

नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग सोळाव्या दिवशी गोंधळाचं वातावरण आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली. 

Dec 7, 2016, 11:52 PM IST

पंतप्रधान मोदींचा चहावाला झाला कॅशलेस

पंतप्रधान मोदींच्या शपथ ग्रहण सोहळ्यात सहभागी झालेला चहावाला देखील कॅशलेस झाला आहे. त्यांच्या दुकानावर डेबिट कार्डने देखील पैसे देण्याची सोय केली आहे.

Dec 7, 2016, 03:58 PM IST

दिल्ली होणार कॅशलेस

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.  

Dec 7, 2016, 02:00 PM IST

राष्ट्रपती आणि पंतप्रधान जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी राहणार उपस्थित

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांची 73 दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी  रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली. 

Dec 6, 2016, 10:00 AM IST

ओबामा, ट्रम्प यांना मागे टाकत मोदी बनले जगातील प्रभावी व्यक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठीत टाईम मॅगजीनवर पर्सन ऑफ द ईयरच्या ऑनलाइन रीडर्स पोलमध्ये अनेकांना मागे टाकलं आहे. पीएम मोदींनी जगातील अनेक नेत्यांना, कलाकारांना आणि इतर क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींना मागे टाकलं आहे.

Dec 5, 2016, 01:03 PM IST

आयकर विभागाच्या छाप्यात ७२ लाखांच्या नवीन नोटा जप्त

नोटाबंदीनंतर देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक किंवा एटीएमच्या बाहेर लोक तासनतास रांगा लावून उभे आहेत. तर एकीकडे काही भ्रष्ट लोक ओळखीच्या आधारे बॅंकांच्या रांगेत उभे न राहता जुन्या नोटा बदलून घेत आहेत.  

Dec 4, 2016, 06:42 PM IST

नोटाबंदीनंतर बँकेत तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा

केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत विविध बँकांमध्ये तब्बल 9.85 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झालीये. जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी साडेतीन आठवडे बाकी आहेत. 

Dec 4, 2016, 02:00 PM IST

सोन्याच्या दरात आणखी घट

नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.

Dec 4, 2016, 01:20 PM IST