pm modi

यु.पी.को बाप (मोदी) पसंद है'

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय. तब्बल ३००हून अधिक जागांवर भाजपने न भूतो न भविष्यति असे यश मिळवलंय.

Mar 11, 2017, 02:25 PM IST

युपीत भाजपच्या यशानंतर बिहारमध्ये रंगलं युद्ध

उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरप्रदेशातील विजयावर अनेकांच्या भूवया उंचावल्या. पण याचा प्रभाव बिहारमध्ये देखील दिसू लागला आहे. बिहारमध्ये यावरुन आता वॉर सुरू झाला आहे. बिहारमध्ये यूपीतल्या विजयानंतर या दोन नेत्यामध्ये युद्ध रंगू लागलं आहे. आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव आणि भाजपचे नेता सुशील मोदी यांच्यात वॉर सुरु झाला आहे. सुशील मोदींच्या ट्विटवर लालू यादव यांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिलं.

Mar 11, 2017, 01:26 PM IST

'२०१९ विसरा आता २०२४ निवडणुकीची तयारी करा'

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचं यश पाहता विरोधकांनी २०१९च्या निवडणुकीचा विचार सोडून आता २०२४ मधील निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात करावी अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.

Mar 11, 2017, 12:21 PM IST

३७ वर्षानंतर भाजपने रचला इतिहास

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे. पण तरीही भाजपला या दोन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळतांना दिसत आहे.

Mar 11, 2017, 11:31 AM IST

मुख्यमंत्री अखिलेश यादवांची मोदींवर टीका

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आता काही वेळात थांबणार आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात थांबवून आता काम की बात सुरु करावी असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लगावला आहे.

Mar 6, 2017, 04:14 PM IST

रोड शो आधी गढवाघाट आश्रमात पोहोचले पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या तीन दिवसांपासून वाराणसीमध्ये आहेत. आज ते पुन्हा एकदा रोड शो करणार आहेत. पण त्याआधी सकाळी ते गढवाघाट आश्रम पोहोचले. तेथे त्यांनी गायींना चारा खाऊ घातला.

Mar 6, 2017, 11:54 AM IST

मोदींच्या भेटीनंतर सीएम गप्पच, भाजपमध्ये प्रचंड असवस्थता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्री माघारी आले तरी ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असवस्थता आहे.

Mar 1, 2017, 08:12 PM IST

युती तुटणार, राज्यात मध्यावधी निवडणुका होणार ?

आगामी ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला जर चांगलं यश मिळालं तर मग महाराष्ट्रात शिवसेनेशी कायमची युती तोडून स्वबळावर निवडणुका लढून राज्यातही सत्ता आणण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. त्यामुळे राज्यात मध्यवती निवडणुका होणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

Mar 1, 2017, 01:42 PM IST

'मन की बात'मधून पंतप्रधानांनी केलं इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक

नरेंद्र मोदींनी आज मन की बातमधून देशाशी संवाद साधला. पंतप्रधानांनी म्हटलं की, 'वसंताचं आगमन झालं आहे. जेव्हा वातावरण छान असतं तेव्हा माणूस त्याचा आनंद घेतो. काही दिवसांपूर्वीच भारताने १०४ सॅटेलाईट लॉन्च केले. संपूर्ण जगाने भारताच्या वैज्ञानिकांचं कौतूक केलं. इस्रोने देशाचं नाव उंचावलं. या वर्षी देशात २७०० लाख टन धान्याचं उत्पादन झालं जे एक रेकॉर्ड आहे. असं वाटतं की, शेतकरी रोज पोंगल आणि वैशाखी साजरा करत आहे.'

Feb 26, 2017, 01:31 PM IST

अपर्णा यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका

उत्तर प्रदेशमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. ११ जिल्ह्यांमध्ये ६७ जागांसाठी आज उमेदवार आपलं नशीब आजमातायंत. तर सूबेमध्ये १९ फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. लखनऊमधील कैंट विधानसभा सीटवर चुरशीची लढाई आहे. मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा यादव यांची टक्कर भाजप उमेदवार रिता बहुगुणा आणि बीएसपी उमेदवारासोबत होणार आहे.

Feb 15, 2017, 04:11 PM IST

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार

Feb 8, 2017, 09:38 AM IST

ऐतिहासिक बजेट असल्याची पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

बजेट 2017-18 च्या आर्थिक वर्षाच्या बजेटचं पंतप्रधान मोदींनी कौतूक करत ते ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. हे बजेट आर्थिक मजबूती देईल आणि पारदर्शकता आणेल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

Feb 1, 2017, 02:21 PM IST

पंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर, शिवसेना खासदार बहिष्कार टाकणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठीची युती तुटल्यानंतर, शिवसेना भाजपमधले संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोदींनं बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलाय. तर तृणमूल काँग्रेसचे खासदारांनीही या बैठकीला उपस्थित न राहण्याचं ठरवलं आहे.

Jan 30, 2017, 01:48 PM IST

मुस्लीम शिक्षक आणि मौलवींनी घेतली मोदींची भेट

मुस्लीम समुदायाच्या शिक्षक आणि मौलवींनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या मुलाखतीत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि एमजे अकबर देखील उपस्थित होते. यावेळेस पंतप्रधानांनी भारताची सभ्यता आणि संस्कृतीचं संदर्भ देत येथे कट्टरपंथीयांसाठी कोणतीच जागा नसल्याचं म्हटलं आहे. पण जगातील अनेक देशांमध्ये अजूनही कट्टरपंथीयांचा बोलबाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Jan 19, 2017, 08:04 PM IST