आयकर विभागाच्या छाप्यात ७२ लाखांच्या नवीन नोटा जप्त

नोटाबंदीनंतर देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक किंवा एटीएमच्या बाहेर लोक तासनतास रांगा लावून उभे आहेत. तर एकीकडे काही भ्रष्ट लोक ओळखीच्या आधारे बॅंकांच्या रांगेत उभे न राहता जुन्या नोटा बदलून घेत आहेत.  

Updated: Dec 4, 2016, 06:42 PM IST
आयकर विभागाच्या छाप्यात ७२ लाखांच्या नवीन नोटा जप्त title=

लुधियाना: नोटाबंदीनंतर देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक किंवा एटीएमच्या बाहेर लोक तासनतास रांगा लावून उभे आहेत. तर एकीकडे काही भ्रष्ट लोक ओळखीच्या आधारे बॅंकांच्या रांगेत उभे न राहता जुन्या नोटा बदलून घेत आहेत.  

लुधियानातील गुरूदेवनगरमध्ये देखील एका पॉश परिसरात आयकर विभागाने बजाज सन्स उद्योजकाच्या ऑटो पार्टस निर्माताच्या घरावर आणि कारखान्यावर छापे मारले असता ७२ लाखांच्या नवीन नोटांसोबतच ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.   

बँकेतून नवीन नोटा काढण्यासाठी मर्यादा असताना देखील व्यापाऱ्याकडे एवढ्या मोठ्याप्रमाणात नोटा आल्याच कशा याची चौकशी आयकर विभाग करत आहे.