नवी दिल्ली : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचं यश पाहता विरोधकांनी २०१९च्या निवडणुकीचा विचार सोडून आता २०२४ मधील निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात करावी अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशमधील यश पाहता अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर ट्विट करुन ओमर अब्दुल्ला यांनी हे वक्तव्य केलं आहे. ओमर अब्दुल्ला हे विरोधी पक्षात आहेत. काँग्रेससोबत ते आघाडीमध्ये होते. त्यांनी म्हटलं की, यूपीमध्ये जे काही झालं ती केवळ एखाद्या डबक्यातील लाट नाही तर ती त्सुनामी आहे.
राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञांना याचा अंदाज कसा आला नाही' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. '२०१९च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना आणि भाजपला आव्हान देऊ शकेल असा एकही नेता सध्या देशात नाही. मात्र भाजपचा पराभव करता येणार नाही असं काही नाही. पंजाब, गोवा व मणिपूरचा निकाल हा त्याचा पुरावा आहे. पण त्यासाठी टीका-टिप्पणीचं राजकारण सोडून सकारात्मक राजकारण करावं लागेल. मोदींवर टीका करून काही होणार नाही. मोदींना पर्याय आहे, हे लोकांना पटवून द्यावं लागेल असं मत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलं.
How the hell did almost all the experts/analysts miss this wave in UP? It's a tsunami not a ripple in a small pond.
— Omar Abdullah (@abdullah_omar) March 11, 2017