note banned

नोटबंदीनंतर केली असेल खरेदी तर येणार अडचणीत

८ नोव्हेंबरनंतर नोटबंदी झाली त्यानंतर काळा पैसा जवळ ठेवणाऱ्यांची झोप उडाली. अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक जण आयकर विभागाच्या जाळ्यात अडकले. पण आता ज्यांनी नोटबंदीनंतर मोठी खरेदी केली आहे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Jan 2, 2017, 02:17 PM IST

उत्तर प्रदेशात प्रचारासाठी खरेदी केल्या 1650 बाईक्स

नोटबंदीनंतर देशभराक रोख रक्कमेची कमतरता भासत आहे. नोटबंदीला महिना पूर्ण झाला आहे. अजूनही काही ठिकाणी एटीएम आणि बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. पण भाजपने मात्र या निवडणुकीच्या प्रचारासाठी 1650 बाइक खरेदी केल्या आहेत.

Dec 15, 2016, 01:15 PM IST

संघाचे विचारक एस गुरूमूर्ती यांनी केलं नोटाबंदीचं जोरदार समर्थन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक एस गुरूमूर्ती यांनी नोटाबंदीचं जोरदार समर्थन करताना 2 हजाराच्या नोटा येत्या पाच वर्षात बंद होतील असा विश्वास व्यक्त केलाय. 2 हजाराच्या नोटा ही तात्पुरती तरतूद आहे. त्यांचा उपयोग संपला की या नोटा बंद होतील असं त्यांनी दिल्लीत म्हटलंय.

Dec 13, 2016, 01:49 PM IST

नोटबंदी हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा - पी चिदंबरम

नोटाबंदीचा निर्णय हा मोदी सरकारनं केलेला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. ते आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी नागपुरात आहेत. या मेळाव्याआधी चिदंबरम यांनी नोटाबंदीचा निर्णयाविषयी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी हा आरोप केला.

Dec 13, 2016, 01:10 PM IST

भारतानंतर या देशाने केली नोटबंदीची घोषणा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महिन्यापूर्वी नोटबंदीचा निर्णय घेतला आणि देशासह अनेक देशांना या निर्णयाचा धक्का बसला. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यानंतर आता वेनेजुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी देखील देशातील मोठी नोट म्हणजेच 100 बोलिवरच्या नोटेवर बंदी आणली आहे. 

Dec 12, 2016, 01:40 PM IST

नोटबंदीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नोटबंदीचा खोचक प्रतिक्रिया

Dec 8, 2016, 03:25 PM IST

नोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी

नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.

Dec 1, 2016, 12:05 PM IST

बापरे ! तर ही असेल पंतप्रधान मोदींची पुढची मोठी घोषणा ?

पंतप्रधान मोदींचा पुढचा मोठा निर्णय

Nov 29, 2016, 03:27 PM IST

भारत बंद संदर्भातील एक फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

नोटबंदीविरोधात आज विरोधकांनी भारत बंदची घोषणा दिली आहे. मोदी सरकारने घेतलेल्या अचानक नोटबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. नोटबंदीच्या मुद्द्यावर संसेदत देखील मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. दोन्ही सभागृहांचं कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आलं. मोदी सरकारतच्या या निर्णयाचं अनेकांकडून कौतूक होतंय तर काही जन याच्या विरोधात आहेत. भारत बंदला इतका प्रतिसाद मिळणार नाही हे स्पष्ट दिसतंय. यासंबंधितच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसतोय. ज्यामध्ये भारत बंदचा विरोध करत दुकानदाराने एक फलत दुकानावर लावलं आहे.

Nov 28, 2016, 08:30 AM IST

नोटबंदीनंतर पगाराची समस्या येऊ नये म्हणून आखली जातेय रणनिती

नोटबंदीनंतर आता महिना संपत आला आहे. त्यामुळे पगाराची वेळ जवळ आली आहे. नवा महिना सुरु होताच लोकांना पगार द्यावे लागणार आहेत. दूधवाला असो की पेपरवाला त्यांना रोख रुपये द्यावे लागणार आहे. पण पगार मात्र अनेकांना त्यांच्या सॅलरी अकाउंटमध्येच मिळतो. त्यामुळे आता या समस्येपासून निपटण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.

Nov 26, 2016, 12:59 PM IST

निर्णय मागे घेणं मोदींच्या रक्तात नाही - वैंकया नायडू

नोटबंदीविरोधात काळापैसा बाळगणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. बँका आणि एटीएमच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम दिसत आहे.

Nov 23, 2016, 04:05 PM IST

नोटबंदीचा निषेध करणार १३ पक्ष आणि २०० खासदार

 नोटबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी संसदेतील तेरा पक्ष आणि जवळपास दोनशे खासदार संसद भवन परिसरात एकत्र जमणार आहेत. सर्वपक्षीय निषेध आंदोलनात याआधी कधीही सामील न झालेल्या बसपा अध्यक्षा मायावतीसुद्धा सहभागी होतील.

Nov 23, 2016, 09:44 AM IST

नोटाबंदीनंतर बँकेमध्ये जमा झाले ५,११,५६५ कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर ९ आणि १० नोव्हेंबरला बँक बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर नोटा बदली करण्याची प्रक्रिया सुरु झाली.

Nov 21, 2016, 03:48 PM IST