नोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी

नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.

Updated: Dec 1, 2016, 12:05 PM IST
नोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी title=

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.

असं काय झालं ७ दिवसात

सर्राफा बाजाराला फटका हा नोटबंदीनंतर काम बंद ठेवल्यामुळे देखील बसला आहे. नोटबंदीआधी ७ नोव्हेंबरला सोनं ३०,८५० रुपये तर चांदी ४३,६०० रुपये किलो होती. पुढच्या दिवशी चांदी वाढून 43,850 रुपये किलो झाली. तर सोनं 31,750 रुपये तोळं झालं.

८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या आणि सराफा बाजाराला मोठा फटका बसला. नोटबंदीनंतर ५०० आणि १००० च्या जुन्य़ा नोटा चालवल्या जात असल्याच्या माहितीनंतर आयकर विभागाने अनेक ठिकाणी छापे मारले. सराफा व्यापाऱ्यांनी या विरोधात १७ दिवस दुकाने बंद ठेवली.

नोटबंदीनंतर सोन्याच्या विक्री ८० टक्क्यांनी घसरली. सोनं खरेदी करतांना लोकं विचार करत आहेत. १६ दिवसानंतर सर्राफा बाजार उघडल्यानंतर १७५० रुपयांनी सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या. गेल्या ३ दिवसात देखील सोन्याच्या किंमतीत घट पाहायला मिळाली.