नोटबंदी हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा - पी चिदंबरम

नोटाबंदीचा निर्णय हा मोदी सरकारनं केलेला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. ते आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी नागपुरात आहेत. या मेळाव्याआधी चिदंबरम यांनी नोटाबंदीचा निर्णयाविषयी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी हा आरोप केला.

Updated: Dec 13, 2016, 01:10 PM IST
नोटबंदी हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा - पी चिदंबरम  title=

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय हा मोदी सरकारनं केलेला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. ते आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी नागपुरात आहेत. या मेळाव्याआधी चिदंबरम यांनी नोटाबंदीचा निर्णयाविषयी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी हा आरोप केला.

सरकारकडे महिन्याभरता फक्त 300 कोटी रुपयांच्या नोटा छापण्याची क्षमता आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किमान सात महिने लागतील असही चिदंबरम यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे जिल्हा सहकारी बँकाना या निर्णयातून का वगळण्यात आलं, असा प्रश्नही चिदंबरम यांनी यावेळी विचारला.