जेडीयूचा भाजपपासून काडीमोड!
जेडीयुनं एनडीए आणि भाजपपासून काडीमोड घेतलाय. भाजपमधील घडामोडी जेडीयुच्या धोरणांशी विसंगत असल्याचं सांगत नैतिकतेच्या आधारावर एनडीएपासून फारकत घेत असल्याची घोषणा जेडीयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.
Jun 16, 2013, 05:55 PM ISTनीतिशकुमार म्हणजे आडवाणींचे पोपट- लालू प्रसाद
नितीश कुमार हे अडवाणींच्या इशा-यावर चालणारे पोपट असल्याची टीका लालू प्रसाद यादवांनी केली आहे. त्यांना स्वतःचा विचार नसल्याचंही लालू प्रसाद यादव म्हणाले.
Jun 12, 2013, 06:59 PM ISTमोदींनिवडीनंतर एनडीएत आघाडीची बिघाडी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे निवडणूक प्रचाराची सूत्र आल्यामुळे भाजपचा मित्रपक्ष जेडीयू नाराज आहे. तसेच भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे एनडीएशी संबंध तोडण्याची तयारी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी चालवल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 12, 2013, 03:12 PM ISTअडवाणींना व्हायचं होतं किमान ६ महिने तरी पंतप्रधान!
भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणींच्या राजीनाम्यामुळे नवा संघर्ष सुरू झाला आहे. मोदींचं वाढतं प्रस्थ हेच अडवाणींच्या राजीनाम्यामागचं कारण असावं, असंच दिसून येत आहे. अडवाणींच्या राजीनाम्यामागे आणखी एक कारण असल्याचा खुलासा झाला आहे.
Jun 11, 2013, 03:54 PM ISTपंतप्रधान उमेदवारीवरुन शिवसेनेच्या भाजपला कानपिचक्या
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन जेडीयु आणि भाजपमध्ये बिनसलं असतानाच, शिवसेनेनंही यावरुन भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.
Apr 17, 2013, 03:24 PM ISTनीतिश कुमारांचा मोदी विरोध कायम!
नितीश कुमार यांनी मात्र मोदींना विरोध मावळला नसल्याचेच संकेत दिले आहेत. भाजपला गर्भित इशारा देताना नितीश कुमारांनी युतीच्या मुलभूत रचनेतला बदल खपवून घेतला जाणार नाही असं म्हटलंय.
Apr 14, 2013, 09:54 PM ISTभाजप विरुद्ध भाजप
उद्याच्या भारत बंदमध्ये पुण्यात भाजप सहभागी होणार नाही.. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय.. डिझेल दरवाढ आणि एफडीआयविरोधात एनडीएनं भारत बंदची हाक दिलीय.. मात्र पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये भाजप सहभागी होणार नसल्याचं शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी सांगितलंय.. तसंच पुण्यातल्या नागरिकांनी ऐच्छिक बंद पाळावा असं त्यांनी म्हटलंय
Sep 19, 2012, 08:54 PM ISTयुपीएला धोका नाही- नीतिश कुमार
केंद्रातल्या य़ुपीए सरकारला धोका नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी म्हटलंय. भाजपनं केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना नीतिश कुमारांनी वक्तव्य करुन भाजपच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय.
Sep 17, 2012, 04:12 PM ISTएनडीएच्या `बंद`कडे शिवसेना,मनसेची पाठ
डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात एमडीएने २० सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. मात्र या बंदमध्ये शिवसेना भाग घेणार नाही. तसंच मनसेचाही य बंदला पाठिंबा नाही. गणेशोत्सवाच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शिवसेनेने बंदमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 16, 2012, 09:36 PM IST`एनडीए`ची भारत बंदची घोषणा...
डिझेलची दरवाढ आणि ‘एफडीआय’च्याविरोधात एनडीएनं २० सप्टेंबरला भारत बंद पुकारलाय. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी याविषयीची घोषणा केली. तसचं पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
Sep 15, 2012, 07:38 PM ISTमोदींची रथयात्रा सुरू; एनडीएचा वाढता विरोध
दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यभरातल्या यात्रेला आजपासून सुरूवात केली.
Sep 11, 2012, 03:26 PM ISTमोदी विरुद्ध मोदी!
एनडीएमधला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या वादात आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही उडी घेतलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं वक्तव्य भाजपच्या सुशील मोदी यांनी केलंय.
Sep 3, 2012, 11:12 AM ISTएनडीएने दिली जसवंत सिंग यांना उमेदवारी
एनडीएने देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नेते जसवंत सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ही घोषणा केली आहे.
Jul 16, 2012, 12:39 PM ISTएनडीएची बैठक निष्फळच
राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जींची सर्वसंमतीनं निवड होणार की नाही याबाबतचं चित्र आजही स्पष्ट होऊ शकलं नाही. या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी एनडीएनं बोलावलेली बैठक आज कोणताही निर्णय न होताच संपली.
Jun 17, 2012, 09:25 PM ISTएनडीएची कोंडी; राष्ट्रपती उमेदवारावर मतभेद
नवी दिल्लीत एनडीएची आज झालेली बैठकही निष्फळ ठरली. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी दोन तास एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर झाला नाही. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर एनडीएत मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय.
Jun 17, 2012, 03:47 PM IST