नीतिश कुमारांचा मोदी विरोध कायम!

नितीश कुमार यांनी मात्र मोदींना विरोध मावळला नसल्याचेच संकेत दिले आहेत. भाजपला गर्भित इशारा देताना नितीश कुमारांनी युतीच्या मुलभूत रचनेतला बदल खपवून घेतला जाणार नाही असं म्हटलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 14, 2013, 09:54 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
नितीश कुमार यांनी मात्र मोदींना विरोध मावळला नसल्याचेच संकेत दिले आहेत. भाजपला गर्भित इशारा देताना नितीश कुमारांनी युतीच्या मुलभूत रचनेतला बदल खपवून घेतला जाणार नाही असं म्हटलंय.
भाजप मोठा पक्ष असला, तरी NDAतले सहकारी म्हणून आपलं म्हणणं ऐकून घेतलंच पाहिजे, असा नितीश यांचा आग्रह आहे. देशातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारी व्यक्तीच देशाचं नेतृत्व करू शकते, असं नितीश कुमारांनी म्हटलंय. त्याच वेळी आपण स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. इतकी कमी ताकद असलेल्या पक्षाच्या नेत्यानं अशी स्वप्न बघायची नसतात, असं नितीश म्हणाले आहेत.

आजच नितीश कुमार यांचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास विरोध नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला होता. मात्र नीतिश कुमार यांनी विरोध कायम असल्याचं दाखवून दिलं आहे.