www.24taas.com, पाटणा
युपीए सरकारबद्दल देशभरात असंतोष खदखदत असून २०१४च्या पूर्वीच मध्यावधी निवडणुका घडण्याची शक्यता वर्तवली जात असताना नीतिश कुमारांनी मात्र वेगळंच निरीक्षण नोंदवलंय. एकीकडे युपीएचे घटक पक्षही युपीएला धारेवर धरत असताना नीतिश कुमार मात्र युपीए सरकारबद्दल निश्चिंत आहेत.
केंद्रातल्या य़ुपीए सरकारला धोका नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी म्हटलंय. भाजपनं केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना नीतिश कुमारांनी वक्तव्य करुन भाजपच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय.
या शिवाय नीतिश कुमारांनी २०१४ बद्दलही काही भाकितं वर्तवली आहेत. काँग्रेस कसंही करुन त्यांचं बहुमत गोळा करेलच. त्यामुळे युपीएला तुर्तास कुठलाच धोका नाही. त्यामुळे जी काही राजकीय उलथापालथ घडेल, ती 2014 नंतरच..च असा दावा नीतिश कुमारांनी केलाय. युपीएचा कोणताही घटकपक्ष पाठिंबा काढून घेणार नाही असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलंय.