msrtc

२५ वर्ष सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही : रावते

पुढची २५ वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांची मागणी धुडकावून लावली आहे. आपल्या विविध मागण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला असून यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यावर उत्तर देताना दिवाकर रावते असे म्हणाले. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.

Oct 17, 2017, 12:13 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू, प्रवाशांना मनस्ताप

ऎन दिवाळीच्या धावपळीत पगारवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे दिवाळीसाठी बाहेरगावी जाणा-या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Oct 17, 2017, 08:01 AM IST

एसटीचे १७ हजार निलंबीत कर्मचारी पुन्हा सेवेत

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या निलंबीत कर्मचा-यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय. 

Sep 29, 2016, 11:00 PM IST

एसटी कर्मचारी संघटनेच्या संपाला मनसेचा विरोध

एसटी कर्मचा-यांनी येत्या १७तारखेला पुकारलेल्या संपाला मनसे परिवहन सेनेनं विरोध केलाय. एसटीमधल्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना कर्मचा-यांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोपही मनसे परिवहन संघटनेनं केलाय.

Sep 13, 2012, 10:37 AM IST