Breast Cancer अगोदर हिना खान झाला होता 'हा' आजार, पोटातून तोंडापर्यंत यायचं रक्त

Hina Khan Disease : हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. पण हिना खानला काही महिन्यांपूर्वी एक विचित्र आजार झाला होता. त्या  आजाराबद्दल जाणून घेऊया. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 1, 2024, 02:01 PM IST
Breast Cancer अगोदर हिना खान झाला होता 'हा' आजार, पोटातून तोंडापर्यंत यायचं रक्त  title=

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानला स्टेज 3 च्या ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. तसेच त्यावर उपचार सुरु आहे. ही माहिती स्वतः हिना खानने दिली आहे. यामध्ये तिन्ही म्हटलं की, मी हिंमतीने या आजाराचा सामना करायला तयार आहे. 

ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आहे. या जीवघेण्या आजाराची 3 स्टेज म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर लिम्फ नोड्स आणि ब्रेस्टच्या आसपास पसरला आहे. आता हिना खानवर उपचार सुरु असून तिने दिलेल्या माहितीनुसार, ती आता ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंमतीने ती या आजाराशी दोन हात करत आहे. 

काही महिन्यांपूर्वी रमजानच्या दिवसांमध्ये हिना खानला एका विचित्र आजाराचा सामना करावा लागला. ज्यामध्ये तिला मोठ्या प्रमाणात ऍसिडिटी झाली असून पोटात जेवण पूर्ण परत येत असे. मेडिकल भाषेत याला गर्ड (GERD) ऍसिड रिफ्लक्स असे म्हणतात. 

(हे पण वाचा -सेलिब्रिटी असूनही कॅन्सरची माहिती लास्ट स्टेजला का कळते? नेमकं कुठे चुकतं?)

GRED आजाराने त्रस्त 

तीन महिन्यांपूर्वी रमजानमध्ये हिना खानला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD) या आजाराने ग्रासले होते. हिनाने सांगितले होते की, रमजानच्या महिन्यात तिची प्रकृती बिघडली आहे. 

गर्ड म्हणजे ऍसिड रिफ्लक्स म्हणजे काय? 

गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD), ऍसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ म्हणून ओळखले जाते. हा एक पाचक रोग आहे. ज्यामध्ये पोटातील ऍसिड वारंवार अन्ननलिकेमध्ये परत जाते.

गर्डची लक्षणे

छातीत जळजळ - छातीमध्ये जळजळ किंवा त्रास होणे. हे सामान्यपणे जेवल्यानंतर जाणवते. तसेच रात्री झोपल्यावर याचा त्रास जाणवतो. 

आबंट ठेकर -पोटातील ऍसिड तोंडात येऊ शकते. ज्यामध्ये आंबट ठेकर आणि तेलकटपणा तोंडात येतं. 

(हे पण वाचा - हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत सांगितली आजाराची स्टेज)

गिळताना त्रास होतो - ऍसिड अन्नप्रणालीसाठी घातक असते. ज्यामध्ये गिळण्यासाठी त्रास होऊ शकतो. 

गळ्यात खवखव - ऍसिडिटीमुळे गळ्यामध्ये देखील जळजळ होऊ शकते. ज्यामुळे खोकल्याचा त्रास देखील होऊ शकतो. 

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)