चार दिवसात ‘कल्कि 2898 एडी’ नं केली 300 कोटींची कमाई, हिंदीत कमावले इतके कोटी

Kalki 2898 AD Box Office Collection Day 4 : अमिताभ बच्चन यांच्या ‘कल्कि 2898 एडी’नं चार दिवसात कमावले इतके कोटी...

दिक्षा पाटील | Updated: Jul 1, 2024, 08:21 AM IST
चार दिवसात ‘कल्कि 2898 एडी’ नं केली 300 कोटींची कमाई, हिंदीत कमावले इतके कोटी title=
(Photo Credit :Social Media)

Kalki 2898 AD Box Office Collection Day 4 : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘कल्कि 2898 एडी’ नं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटानं चार दिवसात बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार केला आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं देखील चांगली कमाई केली आहे. 

साल 2024 की सबसे ज्यादा कमाई करने वाली फिल्म

Sacnilk च्या मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फाइटर’ या हृतिकच्या चित्रपटानं जास्त कमाई केली होती. पण आता ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटानं हा खिताब स्व:ताच्या नावी केला आहे. ‘फाइटर’ नं एकूण 212.79 कोटींची कमाई केली होती. तर दुसरीकडे ‘कल्कि 2898 एडी’ नं चार दिवसात 302.4 कोटींची कमाई केली आहे. 

‘कल्कि 2898 एडी’ चं चार दिवसांचं कलेक्शन

पहिल्या दिवशी चित्रपटानं 95.3 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा घसरला असून चित्रपटानं 57.6 कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाली आणि चित्रपटानं 64.5 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी या चित्रपटानं 85 कोटींची कमाई केली. एकंदरीत या चित्रपटानं 302.4 कोटींची कमाई केली.  

हिंदी व्हर्जनचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

आता हिंदी व्हर्जनच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. तर चार दिवसात चित्रपटाचं कलेक्शन हे 100 कोटीं पेक्षा जास्त झालं आहे. चित्रपटानं पहिल्या दिवशी 22.5 कोटी, दुसऱ्या दिवशी 23 कोटी, तिसऱ्या दिवशी 26 कोटीची कमाई केली आहे. तर चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी या कमाईत देखील वाढ झाली आणि या चित्रपटानं 39 कोटींची कमाई केली. एकूण या चित्रपटानं हिंदीत 110.5 कोटींची कमाई केली. 

हेही वाचा : एकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'

‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटात प्रभास, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त कमल हासन  आणि दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि दुलकर सलमान यांच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिका आहेत.