एसटी संप : राज्यात प्रवाशांचे हाल आणि त्यात प्रवाशांची लूट
संपामुळे एसटीची सेवा पूर्णत: ठप्प आहे. रत्नागिरीत सेवा कोलमडली असून कोल्हापुरात संपामुळे प्रवाशांचे हाल तर होतातच आहेत. त्याशिवाय प्रवाशांची लूटही सुरु झालीय. खासगी बसेसनी अव्वाच्या सव्वा दर आकारायला सुरुवात केलीय. तर अहमदनगर येथे स्कूल बसचा आधार घेण्यात आलाय.
Oct 19, 2017, 03:58 PM ISTएसटी संप : उद्धव ठाकरे गप्प का ?
एसटीचा संप तिसऱ्या दिवशी सुरुच आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले अनेक लोक दिवाळीसाठी घरी पोहोचू शकलेले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अशावेळी नेहमी अग्रणी असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गप्प का, असा सवाल केला जात आहे.
Oct 19, 2017, 02:58 PM ISTएसटी संपामुळे दोन दिवसात ५० कोटींचे नुकसान
एसटीचा संप आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या संपाचा मोठा आर्थिक फटका बसलायाय. संपाच्या दोन दिवसांत एसटीचे ४५ ते ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता आजपासून एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसे संकेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेत.
Oct 19, 2017, 01:13 PM ISTएसटी कामगार कर्मचारी संपात फूट?, ८ गाड्या पोलीस बंदोबस्तात रवाना
एस टी कर्मचारी संपात फूट पडल्याचे दिसत आहे. भोर एसटी डेपोतून ८ गाड्या मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
Oct 19, 2017, 11:12 AM IST