moon

अमेझॉन चंद्रावरही करणार वस्तूंची डिलिव्हरी

चंद्रावर जायची संधी तुम्हाला अमेझॉनकडून मिळू शकते. होय, तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी तुम्हाला लवकरच चंद्रावरही मिळणार आहे.  

Mar 4, 2017, 03:59 PM IST

२ मिनिटात चंद्रावर पोहोचवेल ही सोलार एक्सप्रेस

जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही २ मिनिटात चंद्रावर पोहोचू शकतो तर ? तुम्हाला विश्वास बसणार नाही ना ? पण मनाच्या गतीपेक्षा वेगाने धावणारी एक्सप्रेसवर कॅनडाची एक इनोवेटिव फर्म चार्ल्स बॉम्बार्डियर काम करत आहे. कंपनीने भविष्यात एक अशी सोलार एक्सप्रेसची कल्पना केली आहे जी धरतीवरुन अंतराळात फेरी मारेल. पृथ्वीवरुन मंगळावर पोहोचण्यासाठी याला फक्त २ दिवस लागणार आहे. ऐवढंच नाही तर कश्मीरवरुन कन्याकुमारीला जाण्यासाठी ही ट्रेन फक्त १.२० सेकंड घेईल.

Feb 7, 2017, 09:34 AM IST

आता हनिमूनसाठी चंद्रावर जाण्यासाठी व्हा तयार

'चलो दिलदार चलो.. चाँद के पार चलो...' असं आपल्या प्रियकराला सांगणारी हिरॉईन असो नाहीतर आपल्या प्रेयसीला चंद्र तोडून आणून देण्याचं वचन देणारा हिरो असो. चंद्र हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. चंद्रावर वस्ती करण्याचं स्वप्न हे नील आर्मस्ट्राँगच्या पहिल्या पावलापासून पाहिलं गेलं. मात्र हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणं शक्य आहे. इतकंच काय, लग्नानंतर हनिमूनला चंद्रावर जायचं असेल, तर त्याचं तिकिट देणारी कंपनीही तयार झाली आहे.

Dec 21, 2016, 10:40 PM IST

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा 'चंद्र' शनिवारी!

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा 'चंद्र' शनिवारी! 

Jul 6, 2016, 01:57 PM IST

चंद्र न दिसल्यामुळे गुरुवारी साजरी होणार ईद

पवित्र रमझान महिना ईदच्या दिवशी म्हणजेच बुधवारी संपत आला आहे. उद्या ईद आहे पण चंद्राचं दर्शन न झाल्यानं आता ईद बुधवारऐवजी गुरूवारी साजरी केली जाणार आहे. चंद्र न दिसल्याने दिल्लीच्या जामा मशीदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी ईद गुरूवारी साजरी होणार अशी घोषणा केली आहे. तर लखनऊ चांद कमिटीनेही ईद बुधवार ऐवजी गुरुवारी साजरी केली जाईल अशी घोषणा केली आहे.

Jul 5, 2016, 11:24 PM IST

आजचा चंद्र असणार खास

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सगळ्यात मोठा दिसतो. पण आजची म्हणजेच शुक्रवारची पौर्णिमा याला अपवाद आहे.

Apr 22, 2016, 06:09 PM IST

चंद्र आज ३० टक्के अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान

ह्यूस्टन : ज्यांना चंद्राविषयी कुतुहल आहे, चंद्राचं सौंदर्य न्याहाळायचं आहे, तसेच खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे. आज चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने सूपरमून पाहण्याचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे.

Sep 27, 2015, 08:44 PM IST

30 जून असेल सर्वात मोठा दिवस

वॉशिंग्टन : 30 जून म्हणजेच उद्याचा दिवस थोडा मोठा असणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा)नेही याला अधिकृतरित्या दुजोरा दिलाय. प्रत्येक दिवसात 86,400 सेकंद असतात, पण 30 जूनला एक अतिरीक्त लीप सेकंद जोडला गेल्यामुळे इतर सामान्य दिवसांपेक्षा हा दिवस थोडा मोठा असणार आहे.

Jun 29, 2015, 12:03 PM IST

चंद्रावर हे कोण फिरत आहे?

चंद्रावर कोणीतरी फिरत आहे, असे छायाचित्र अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नासाने पाठविले आहे. या छायाचित्रावरुन माणसाची हालचाल होताना दिसत आहे. 

Aug 14, 2014, 12:14 PM IST

खगोलप्रेमींसाठी गुडन्यूज, आज दिसणार सुपर मून!

आज नारळी पौर्णिमा... रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाच्या शुभ दिनी खगोल प्रेमींसाठीही एक गुडन्यूज आहे... आज चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतोय.. 

Aug 10, 2014, 09:44 AM IST

`लाडी`यान अखेर चंद्रावर आदळले

अमेरिकेच्या `नासा`ने चंद्रावर पाठवलेले `लाडी` हे यान ताशी ५८०० किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले.

Apr 22, 2014, 03:48 PM IST

शनीला आणखी एक चंद्र मिळाला?

शनीला आणखी एक चंद्र मिळाला असल्याचं सांगण्यात येत आहे. शनीचा दुसरा चंद्र म्हटल्या जाणाऱ्या या बर्फाळ, छोटय़ा उपग्रहाला `पेगी` असे नाव देण्यात आलं आहे.

Apr 17, 2014, 09:54 PM IST

आता चंद्रावर फुलणार भाजीपाल्याचा मळा, नासाचे प्रयत्न!

अमेरिकेची नासा ही अवकाश संस्था चंद्रावर विविध भाजीपाल्यांच्या बिया पाठविण्याचं नियोजन करत असून, २०१५ मध्ये तिथं भाजीपाल्याचा मळा फुलविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ब्रिटनमधील एका संकेतस्थळानं याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

Dec 4, 2013, 08:23 PM IST