`लाडी`यान अखेर चंद्रावर आदळले

अमेरिकेच्या `नासा`ने चंद्रावर पाठवलेले `लाडी` हे यान ताशी ५८०० किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले.

Updated: Apr 22, 2014, 03:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमेरीका
अमेरिकेच्या `नासा`ने चंद्रावर पाठवलेले `लाडी` हे यान ताशी ५८०० किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले. या यानाला नासाने `द ल्युनर अॅटमॉस्फिअर अँड डस्ट इनव्हिरॉनमेंट एक्स्प्लोरर` म्हणजेच `लाडी` हे नाव दिले होते. या यानात प्रयोग करण्याइतकेही इंधन उरले नव्हते. या कारणानेच नासाने हे यान चंद्राच्या पृष्ठावर आदळण्याचे ठरवले.
द ल्युनर लेसर कम्युनिकेशन डेमॉनस्ट्रेशन या यंत्रणेमुळे पल्स लेसर किरणांच्या मदतीने चंद्र व पृथ्वी यांच्यातील ३८४६३३ कि.मी.चे अंतर विक्रमी काळात कापून ही माहिती दर सेकंदाला ६२२ मेगाबाइट वेगाने डाऊनलोड होत असे.
`लाडी`यान हे व्हेन्डिंग मशिनच्या आकाराचे होते. तसेच पृथ्वीवरच्या विमानापेक्षा कमी उंचीचे हे यान होते. लाडी प्रकल्प मोहीमेचे अॅमेस येथील प्रकल्प वैज्ञानिक रिक एल्फिक यांनी सांगितले की, लाडी जेव्हा चंद्रावर कोसळले तेव्हा त्याचा वेग ताशी ५७९४ कि.मी इतका होता. या कारणानेच घर्षणामुळे घासून काही प्रमाणात त्याची वाफ झाली असेल. तसेच काही उरलेले अवशेष हे खोल विवरात गेले असतील. या कारणानेच हे यान भूभागावर पडले की विवरात पडले हा खरा मुद्दा आहे.
व्हर्जिनियातील `वॉलॉप्स फ्लाइट फॅसिलिटी` या `नासा`च्या केंद्रावरुन हे यान सप्टेंबर २०१३ रोजी अवकाशात सोडण्यात आले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.