घटस्फोटाच्या अनेक वर्षानंतर इम्रान खानने केला मोठा खुलासा, म्हणाला...

 अनेकदा, जाने तू या जाने ना या फेम अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

Updated: Jun 9, 2024, 03:00 PM IST
घटस्फोटाच्या अनेक वर्षानंतर इम्रान खानने केला मोठा खुलासा, म्हणाला... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि अवंतिका मलिकने 2019 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. या दोघांना इमारा नावाटची गोड मुलगी आहे.  अनेकदा, जाने तू या जाने ना या फेम अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यातील कठीण टप्प्याबद्दल व्यक्तव्य केलं ज्यावेळी तो त्याच्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर त्याच्या 'असुरक्षित' टप्प्यातून जाण्याविषयी बोलला. 

घटस्फोटानंतर इम्रान खानचा कठीण टप्पा 
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इम्रान खानने पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळं झाल्यानंतर वाईट टप्प्यातून जात असल्याचं कबूल केलं. त्याने डिप्रेशनमधल्या काही लक्षणांबद्दल खुलासा केला आणि सांगितलं की,  अंथरुणातून उठणं आणि दात घासणं यासारखी रोजची कामं त्याच्यासाठी मोठ्या आव्हानांन सारखी होती. 

मला अंथरुणातून उठताही येत नव्हतं
पुढे बोलताना अभिनेता म्हणाला, “जेव्हा आम्ही 2019 मध्ये वेगळे झालो, तेव्हा मी भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या सर्वात कमजोर होतो. मी त्याला मानवी त्वचेसारखे म्हणेन. इतकंच माही तर दात घासणं आणि आंघोळ करणं हेही माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. मला हेच समजत नव्हतं की मी हेही करू शकेन की नाही. "मला अंथरुणातून उठताही येत नव्हतं, मी सतत अंथरुणात लोळत पडायचो.  

इम्रान पुढे म्हणाला,दाराची बेल बंद करायचो, दारं बंद करायचो आणि आराम करायचो.मात्र पुढे माझ्याकडे पालकांची कर्तव्ये होती, आमच्या मुलाची कोठडी वाटून घेतली होती, म्हणून गुरुवार ते रविवार माझी मुलगी माझ्यासोबत राहायची. त्यामुळे जेव्हा ती माझ्यासोबत असायची तेव्हा मला कितीही अशक्तपणा वाटायचा याने मला काही फरक पडायचा नाही, काहीही असलं तरी, तुम्हाला तिथे जावंच लागतं.'' असं इम्रान दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.