मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक! जाणून घ्या कारण

Siddharth Jadhav : मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक... तर अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं कारण...

दिक्षा पाटील | Updated: Jun 9, 2024, 04:32 PM IST
मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक! जाणून घ्या कारण title=
(Photo Credit : Social Media)

Siddharth Jadhav : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवनं त्याच्या उत्तम अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. तेही फक्त मराठी चित्रपटसृष्टीत नाही तर त्यासोबत बॉलिवूडमध्ये देखील त्यानं स्वत: ची छाप सोडली आहे. एका सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या व्यक्तीनं त्याच्या टॅलेन्टच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता त्याला त्याच्या कामासाठी गौरविण्यात आलं आहे. याविषयी पुरस्काराविषयी सांगत सिद्धार्थ भावूक झाला आहे. 

सिद्धार्थनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्या पुरस्काराचा आणि त्या सर्टिफिकेटचा फोटो शेअर केला आहे. सिद्धार्थला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराविषयी सांगत सिद्धार्थनं कॅप्शन दिलं की "सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युरी बालभारती नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या 'दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024' मध्ये आमचा चित्रपट 'बालभारती' यासाठी मला जुरीचं 'बेस्ट ऍक्टर' हे अवॉर्ड मिळालं... मनापासून आनंद होतो 'बालभारती' चित्रपटातलं माझं काम राष्ट्रीय पातळीवर अप्रिशिएट केलं जातयं... काम करण्यासाठी तुम्हीजी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे... देशभरातले सगळे रिजनल चित्रपट यात सहभागी झाले होते आणि त्यातून बालभारतीसाठी पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ...आमचे निर्माते सुजय सर ,कोमल मॅम, संपूर्ण टीम आणि मनापासून आभार मानतो मी आमचे दिग्दर्शक लेखक नितिन नंदन. सगळ्यांना खूप प्रेम."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सिद्धार्थच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांना कमेंट करत शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. मग इथे फक्त त्याचे चाहते नाही तर सेलिब्रिटी देखील आहेत. सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सुकन्या मोने यांनी कमेंट करत सिद्धार्थचे अभिनंदन केले आहे. त्या म्हणाल्या 'मनःपूर्वक अभिनंदन'. अभिजीत खांडेकरनं देखील सिद्धार्थचे अभिनंदन केले आहे. तर तेजस्वी पंडीत कमेंट करत 'शाब्बास' असं म्हणाली. इथेच हे सगळं थांबलं नाही तर सिद्धार्थला आणखी सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा : 'पंचायत' फेम अभिनेत्यानं सैफ आणि करीनाच्या रिसेप्शन पार्टीत केलं होतं वेटरचं काम! मग नोकरी सोडली अन्...

सिद्धार्थच्या या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्याचा बालभारती हा चित्रपट डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. इंग्रजी बोलता येत नसलं तरी आपल्या मुलांना इंग्रजी बोलता यावं फक्त या हट्टापायी पालक मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळेत प्रवेश घेतात. या सगळ्याचा मुलांच्या भविष्यावर कसा परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांच्या विकासात कसा अडथळा येतो हे दाखवलं आहे.