एक ना दोन, आता सॅमसंगचा ३ सीमचा फोन!
कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने नवा हँडसेट सादर केला आहे. यात एक नाही दोन नाही तर तब्बल तीन सीमकार्ड आपण वापरू शकतो. गॅलेक्सी स्टार ट्रायो असे या फोनचे नाव असून ब्राझीलमध्ये तो लॉन्च करण्यात आला. लवकरच तो भारतात दाखल होणार आहे.
Feb 13, 2014, 06:12 PM IST`व्हिडिओकॉन`ला कर्मचाऱ्यांकडूनच ७२ लाखांचा गंडा
संगणकीय बनावट नोंदी करून ११ कर्मचाऱ्यांनी व्हिडिओकॉन कंपनीच्या गोदामातील तब्बल पावणेआठ कोटी रुपयांचे मोबाईल हॅंडसेट लंपास केले. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Feb 7, 2014, 01:43 PM ISTआता मोबाइलवर मिळणार लोकलचे तिकीट
तिकीट विन्डोवर लांबच लांब रांगा, बिघडलेल्या कूपन मशिन, अशा त्रासातून आता मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मुक्तता होणार आहे. पण त्यासाठी तुम्हांला पुढील सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.
Jan 29, 2014, 03:46 PM ISTआता रेल्वेत बिनधास्त झोपा, स्टेशन सुटणार नाही
रेल्वेनं प्रवास करतांना आपलं स्टेशन सुटून जाण्याच्या भीतीनं अनेक जण झोपतच नाही. मात्र आता स्टेशन सुटण्याचं टेंशन सोडून द्या... आता आपल्याला स्टेशन यायच्या आधी त्याची माहिती मिळून जाईल.
Jan 28, 2014, 09:25 AM ISTमोबाईलवर गाणी ऐकणे पडले महाग
तुम्ही मोबाईलवर बोलत आहात किंवा गाणी ऐकत असताल तर जरा जपून. तुम्हाला लागलेली तंदरी महाग पडू शकते. असाच प्रकार ठाण्यात घडला. मोबाईलवर बोलत असताना एकाला धक्का लागला आणि त्याला चांगलाच चोप मिळाला. ही घटना वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव परिसरात घडली.
Jan 21, 2014, 02:16 PM ISTमोबाईलवर जाहिराती पाहा आणि पैसे मिळवा
मायक्रोमॅक्स आपल्या स्मार्ट फोनवर जाहिरात पाहण्याच्या बदल्यात पैसे देणार आहे. ही योजना मायक्रोमॅक्सचा आगामी फोन मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस मॅड सोबत लागू होणार आहे. या सारखा प्लान या आधी टाटा डोकोमोने आणला आहे.
Jan 16, 2014, 10:33 AM ISTअविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी...
बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.
Dec 26, 2013, 03:38 PM ISTतुमच्यासाठी कोण महत्त्वाचं... मुलं की मोबाईल?
सगळ्या आई-वडिलांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त वेळ कशासाठी देता? याचं उत्तर एका स्वयंसेवी संस्थेनं सर्वेक्षणाच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न केला.
Dec 25, 2013, 08:33 PM ISTसॅमसंगचा नवा मोबाईल गॅलॅक्सी ग्रँड-२ लॉन्च
सॅमसंगनं मुंबईत गॅलॅक्सी ग्रँड-२ लॉन्च केला. गॅलॅक्सी ग्रँड २ जानेवारीच्य़ा पहिल्या आठवड्यात मार्केटमध्ये विक्रीस उपलब्ध होईल. या फोनची किंमत २२,९०० ते २४,९०० रुपयांदरम्यान असेल.
Dec 24, 2013, 09:04 AM ISTओबामा तिच्याबरोबर बोलले अन् मिशेलचा पारा चढला
कोणत्याही स्त्रीला आपला नवरा दुसऱ्या कोणत्याही महिलेबरोबर जास्त जवळून बोलेला आवडत नाही. तसाच प्रसंग हा मिशेल ओबामा यांच्याबाबतीत घडला आहे. जोहान्सबर्गवर मंगळवारी नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल पोहोचले होते. यावेळी ओबामा डेनिश प्रधानमंत्री हॅले थॉर्निग हिच्याशी गप्पा मारल्या अन् इथंच मिशेल यांचा पारा चढला.
Dec 12, 2013, 02:38 PM ISTइंटरनेटशिवाय मोबाईलवर ट्विटर, टिव टिव करणं सोपं
तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नाही. मात्र, तुम्हाला ट्विटर या सोशल साईट माध्यमातून टिव टिव करायची झाल्यास ते आता शक्य होणार आहे. तुमच्या मोबाईलवर इंटरनेट शिवाय ट्विटर सुरू करता येणार आहे. त्यासाठी यूएसएसडी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘युटोपिया मोबाईल ऍप्स’ची निर्मिती केली आहे.
Dec 12, 2013, 07:49 AM ISTगमतीशीर मोबाईल अॅप्लिकेशन... पण धोकायदायकही!
तुमच्या मोबाईलवर बॉसचा फोन आला... तुम्ही घाईघाईनं तो उचललात आणि पलिकडून आवाज आला तुमच्या मित्राचा... आता तुमचा मित्र बॉससोबत आहे की बॉसचा फोन मित्रानं पळवलाय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.
Nov 28, 2013, 08:05 PM ISTरांगेत उभे न राहता मोबाईलच्या माध्यमातून मिळवा रेल्वे पास
मुंबईतील लोकलची गर्दी पाहिल्यावर नको हा रेल्वेचा प्रवास अशी म्हण्याची वेळ तुमच्यावर येते. तिकिट अथवा पास काढण्यासाठी तासंनतास तिकिट खिडकीसमोर उभे राहावे लागत. मात्र, यातून तुमची आता सुटका होणार आहे.
Nov 27, 2013, 12:58 PM ISTआयफोन हप्त्यावर, दोन वर्षे मोफत सेवा
जगभरात ख्याती मिळवलेल्या आयफोन आता भारतीयांना सहज घेता येणार आहे. त्यासाठी रिलायन्सने हप्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दोन वर्षे मोफत सेवा देण्याचा निर्णयही केला आहे.
Nov 8, 2013, 04:16 PM ISTमोबाईल चोरीला गेला तर...एक उपाय
तुमचा मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला तर...असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल? त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत होण्यासाठी ही माहिती देत आहोत. ती नीट वाचा आणि बिनधास्त राहा. तुम्हीच तुमचा मोबाईल शोधून काढा.
Nov 7, 2013, 09:31 PM IST