`व्हिडिओकॉन`ला कर्मचाऱ्यांकडूनच ७२ लाखांचा गंडा

संगणकीय बनावट नोंदी करून ११ कर्मचाऱ्यांनी व्हिडिओकॉन कंपनीच्या गोदामातील तब्बल पावणेआठ कोटी रुपयांचे मोबाईल हॅंडसेट लंपास केले. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 7, 2014, 01:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
संगणकीय बनावट नोंदी करून ११ कर्मचाऱ्यांनी व्हिडिओकॉन कंपनीच्या गोदामातील तब्बल पावणेआठ कोटी रुपयांचे मोबाईल हॅंडसेट लंपास केले. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पैठण रोडवरच्या चितेगावमध्ये असलेल्या व्हिडिओकॉन कंपनीमध्ये काही कामगार आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून गोदामातील व्हिडिओकॉन, अॅपल, सॅनसुई, सॅमसंग, मायक्रोमॅक्‍स अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाईल हॅण्डसेटची चोरी केली.
एप्रिल २०१३ ते २८ जानेवारी २०१४ या कालावधीत सात कोटी ७२ लाख २५ हजार ८५१ रुपयांचे एकूण सात हजार मोबाईल हॅण्डसेट लंपास केले. यासाठी कर्मचाऱ्यांनी कंपनीतील रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी केल्या. संगणकामध्ये बनावट डाटा तयार करून ही फसवणूक केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर कंपनीचे उपव्यवस्थापकांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.