marathi news

बाबासाहेबांच्या जयंती निमित्त 'महापरिनिर्वाण' चित्रपटातील गाणं प्रदर्शित

Jay Bhim, Mahaparinirvaan : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी केवळ देशापुरताच मर्यदित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे महान विचार, कर्तृत्व ही या गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. 

Apr 5, 2024, 12:03 PM IST

'नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान', कंगना रणौतच्या दाव्यावर प्रकाश राज म्हणतात...

Kangana Ranaut : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नेताची सुभाषचंग्र बोस हे स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान होते असं म्हटलं आहे त्यावर आता अनेकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 5, 2024, 11:06 AM IST

Loksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत

Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट. 

 

Apr 5, 2024, 09:56 AM IST

संधी चालून आली आहे, मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा; शहीद पत्नीला न्याय देण्यावरुन मुंबई हायकोर्टाचे निर्देश

Bombay High Court : शहीद मेजर अनुज सूद यांच्या पत्नीशी संबधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. तीन वर्षांनंतरही दिलासा न मिळाल्यामुळे सरकारने मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे.

Apr 5, 2024, 09:52 AM IST

'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल

Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी

 

Apr 5, 2024, 08:36 AM IST

सांगलीनंतर भिवंडीत काँग्रेसचा गेम; बाळ्यामामांना रिंगणात उतरवल्याने बंडखोरीची शक्यता

Bhiwandi Lok Sabha Election : सांगलीपाठोपाठ भिवंडीमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेस नेत्याने केली आहे.

Apr 5, 2024, 08:35 AM IST

महाराष्ट्राच्या लाडक्या 'अप्सरेचा' मराठमोळा साज

सोनाली कुलकर्णीने तिच्या कुटुंबातील एका विवाहसोहळ्याला हजेरी लावली. याचे काही खास फोटो तिने शेअर केले आहेत.

Apr 4, 2024, 11:00 PM IST

राज्यात 5 एप्रिलपासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेचा इशारा; तापमानातही वाढ

IMD : राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अशात हवामान खात्याच्या माहितीनुसार आठवड्याच्या शेवटी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Apr 4, 2024, 08:49 PM IST

कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती, अहवालात उघड

Kolhapur : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. 

Apr 4, 2024, 07:43 PM IST

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर, बीडमध्ये पंकजा मुंडेंना आव्हान

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात दोन नावांचा समावेश आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकूण सात उमेदवार जाहीर केले आहेत. 

 

Apr 4, 2024, 05:52 PM IST

'मला तरी सध्याची परिस्थिती...'; राजकारणावर सई ताम्हणकरचं रोखठोक मत

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेत तिच्या आगामी चित्रपटांसाठी आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी बोलताना राजकारणात नवनवीन विचारसरणीची गरज असल्याचेही सई ताम्हणकरने म्हटलं.

Apr 4, 2024, 02:46 PM IST

अविवाहित तरुणांचं काय? लोकसभेच्या प्रचारात ज्वलंत मुद्दा ठरणार 35 शी नंतरची Unmarried मुलं

Madha Lok Sabha Constituency : माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारस्कर यांनी अविवाहित तरुणांसाठी अफलातून घोषणा केली आहे.

Apr 4, 2024, 11:40 AM IST

जावयाने कापली सासूची उमेदवारी; यवतामळमधून भावना गवळींऐवजी राजश्री पाटलांना उमेदवारी

Yavatmal Washim Lok Sabha : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

Apr 4, 2024, 09:20 AM IST

कार्यकर्त्यांना विश्वासात घेत एकनाथ खडसे भाजपात परतणार?

NCP Leader Eknath Shinde: एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाबाबत संकेत दिले आहेत. 

Apr 3, 2024, 11:21 AM IST