महाराष्ट्राची लाडकी 'अप्सरा' अशी घराघरात ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

सोनालीला 'नटरंग' या चित्रपटातील 'अप्सरा आली' या गाण्यामुळे एक वेगळी ओळख मिळाली.

सोनालीने आतापर्यंत 'हिरकणी', 'मितवा', 'धुरळा', 'तमाशा लाईव्ह' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून काम करत रसिकांची मनं जिंकली आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.

आता सोनाली कुलकर्णीने तिच्या कुटुंबातील एका विवाहसोहळ्याला हजेरी लावली.

यावेळी तिने निळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली होती.

त्यासोबतच तिने नाकात नथ आणि मराठमोळे दागिनेही परिधान केले होते.

सोनाली ही तिची आई, बाबा, भाऊ यांच्यासोबत लग्नसोहळ्याला उपस्थित होती. याचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत.

"लग्नसोहळ्याची धामधुम आणि कुटुंबासोबतचे काही आनंदाचे क्षण", असे कॅप्शन सोनालीने या फोटोंना दिले आहे.

VIEW ALL

Read Next Story