www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वेकडून सतर्कता आठवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृती करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अनेक स्थानकांवर आणि कार्यालयात बॅनर आणि पोस्टर लावले गेले आहेत.
सतर्कता आठवडा निमित्ताने कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भानूप्रकाश तायल यांनी कर्मचाऱ्यांना प्रामाणिकता आणि पारदर्शिकता विषयी शपथ दिली. या वर्षी कार्यक्रमाचा विषय " सकारात्मक दक्षतेतून चांगले प्रशासन" हा आहे. २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१३ दरम्यान सतर्कता आठवडा म्हणून साजरा केला जात आहे.
कोकण रेल्वेने सतर्कता आठवडा निमित्ताने जनजागृती करण्यासाठी अनेक स्थानकांवर आणि कार्यालयात बॅनर आणि पोस्टर लावले गेले आहेत. आठवडाभरात निबंध स्पर्धा, वाद-विवाद, व्याख्यान, नाटक तसेच एकांकिका आदींचे आयोजन केले गेले. कार्यप्रणालीत सुधारणा करण्याच्या दृष्टिने कर्मचाऱ्यांकडून सल्ले ही मागविले गेले आहेत.
राष्ट्रपतींचा संदेश सतर्कता आठवडा निमित्ताने देण्यात येणार आहे. राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, विकास योजनांचे फळ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चांगले प्रशास महत्वाचे आहे. याची ओळख या निमित्ताने करून देण्यावर भर असणार आहे, असे तायल यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.