khed

मालगाडीचे ४ डबे घसरल्यानं कोकण रेल्वे ठप्प

कोकण रेल्वेवर मालगाडीचे चार डब्बे घसरल्यामुळे वाहतूक ठप्प झालीय. आज सकाळी उक्शी रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडलीय. दरम्यान, मालगाडीचे डबे रुळावरून हटवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या कामासाठी आठ ते दहा तास लागणार असल्याने अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 14, 2014, 11:37 AM IST

खेडमध्ये इमारत कोसळून, तीन मजूर ठार

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाडनाका इथं बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून तीन मजूर ठार झाले आहेत.

Feb 17, 2014, 08:50 PM IST

‘मांडवी एक्स्प्रेस’चा डबा घसरला, मोठा अपघात टळला

खेडजवळ आज सकाळी मांडवी एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरल्यानं कोकण रेल्वेची सेवा ठप्प झालीय. मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन आणि पहिला डबा खेड रेल्वे स्टेशनजवळ रूळावरून घसरला. मात्र रेल्वेरुळ तुटल्याचं चालकाच्या लक्षात येताच चालकानं हजरजबाबीपणा दाखवून एक्स्प्रेस थांबविण्याचा प्रयत्न केला आणि मोठा अपघात टळला.

Oct 6, 2013, 04:39 PM IST

मनसे आंदोलकांवर लाठीचार्ज, ४८ जणांना अटक

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील इंडियन ऑक्झिलेट कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच धडा शिकवला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. कंपनीवर धडक मारून गेट बंद आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मनसेच्या ४८ कार्यकर्त्यांना अटक केली. तर ५० जणांवर गुन्हे दाखल केले. कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Aug 6, 2013, 04:45 PM IST

खेडजवळ झालेल्या अपघातात ११ जागीच ठार

रत्नागिरीत खेडजवळच्या दाबिळ गावाजवळ डंपर आणि क्वालीस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झालाय.

Jun 24, 2013, 03:16 PM IST

खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

Mar 20, 2013, 01:53 PM IST

अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.

Mar 19, 2013, 01:57 PM IST

बस नदीत कोसळली; ३७ जण ठार, १५ जखमी

प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस नदीत कोसळून भीषण दूर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत.

Mar 19, 2013, 08:03 AM IST

शरद पवारांच्या पोस्टरला काळे फासले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील वाद-प्रतिवाद शिगेला पोहोचला असताना खेडमध्ये शरद पवार यांच्या पोस्टरला काळे फासले. त्यामुळे खेड शहरात तणावाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसे कार्यकर्त्यांकडे बोट दाखविले आहे.

Feb 27, 2013, 11:52 PM IST

नक्कल करायलाही अक्कल लागते - राज

पहा राज ठाकरेंनी कोणावर केली टीका, काय म्हणाले राज ठाकरेंच्या भाषणातील हे खास मुद्दे

Feb 15, 2013, 08:28 PM IST

राष्ट्रवादी आमदाराला टोल नाक्यावर मारहाण

पुण्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्यावर आमदार संजय पाटील यांना मारहाण करण्यात आली. आमदार असल्याचं सांगूनही मारहाण केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. दरम्यान, मारहाण प्रकरणी चार कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे.

Apr 30, 2012, 01:45 PM IST

कोकणातील लोक दादागिरीला कंटाळले – राज

कोकणातील लोक दादागिरीला कंटाळले आहेत. त्यांना दहशत नकोय, तसेच कोकणात काम होत नाही, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्योग मंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांना लगावला आहे.

Dec 13, 2011, 04:52 PM IST

मनसेचा ऐतिहासिक विजय, खेड पालिका काबीज!

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत पहिल्यांदाच मनसेनं मिळवली सत्ता मिळवली आहे. राज्यात पहिली नगरपालिका ताब्यात घेण्यात मनसेला यश आले आहे. मनसेने ९, शिवसेना ७, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना प्रत्येकी १ जागावर मिळाला विजय मिळविला आहे.

Dec 12, 2011, 08:54 AM IST