मुंबई-गोवा महामार्गावर टँकर स्फोटात एक ठार, वायुगळतीने भीती

 मुंबई-गोवा हायवेवर खेडजवळ भोस्ते घाटामध्ये एक केमिकलचा टँकर पलटी होऊन त्याचा प्रचंड स्फोट झाला. टँकर दरीत कोसळल्यानंतर बराच वेळ स्फोट होत होते. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी अद्याप टँकरमधून गॅसगळती सुरूच आहे. त्यामुळे प्रसंगी आसपासच्या परिसरातून लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

Updated: Aug 30, 2014, 09:29 AM IST
मुंबई-गोवा महामार्गावर टँकर स्फोटात एक ठार, वायुगळतीने भीती title=

रत्नागिरी : मुंबई-गोवा हायवेवर खेडजवळ भोस्ते घाटामध्ये एक केमिकलचा टँकर पलटी होऊन त्याचा प्रचंड स्फोट झाला. टँकर दरीत कोसळल्यानंतर बराच वेळ स्फोट होत होते. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी अद्याप टँकरमधून गॅसगळती सुरूच आहे. त्यामुळे प्रसंगी आसपासच्या परिसरातून लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

या स्फोटांची तीव्रता इतकी भयानक होती की 10 किलोमीटरच्या परिसरात स्फोटाचे आवाज ऐकू जात होते. घटनास्थळावर संपूर्ण जळलेल्या अवस्थेतला एक मृतदेह सापडला. खेड, चिपळून आणि लोटे MIDCमधून अग्नीशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर तातडीनं घटनास्थळी रवाना करण्यात आले. दरम्यान, रात्री टँकरचा स्फोट झाल्यानंतर हायवेवरची वाहतूक बंद काही काळ बंद करण्यात आली होती.

कोकण रेल्वेची वाहतूक गेल्या आठवड्यापासून विस्कळीत असताना गणपतीला कोकणा निघालेल्यांना रस्त्याचाच आधार होता. मात्र या टँकर अपघातामुळे कोकणवासियांची कोंडीच झाली होती. आता वाहतूक पूर्ववत झाल्यानं यातून काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे गणेशोत्सव काळात 16 टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना हायवेवर बंदी असताना हा केमिकलचा टँकर कसा आला, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.