indian team

...तर इरफान पठानची भारतीय टीममध्ये वापसी

इरफान पठान काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघात दिसू शकतो. सैयद अली ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरी त्याची टीममध्ये वापसी होऊ शकते. त्याने या ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त १७ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याच्या बॅटनेही चांगली कामगिरी केली होती.

Feb 2, 2016, 11:15 PM IST

विराटचे नेतृत्व दमदार मात्र वैयक्तिक कामगिरी चांगली नाही

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील गेल्या वर्षात भारतीय संघाने चांगली कामगिरी केलीये. कोहलीच्या नेतृत्वाखालील तब्बल २२ वर्षांनी भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला त्यांच्या मातीत धूळ चारली. त्यानंतर मायभूमीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला चीतपट केले.

Jan 3, 2016, 12:24 PM IST

video : सोचो जीत की

येत्या १२ जानेवारी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी टीमला चीअर अप करण्यासाठी स्टार स्पोर्ट्सने नवा व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. जेव्हा आपले इरादे मजबूत असतील तर काहीही अशक्य नसते हा संदेश या व्हिडीओतून देण्यात आलाय. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ. 

Dec 21, 2015, 09:08 AM IST

टीम इंडियात खेळण्याच्या लायकीचे नाहीत धोनी, रैना - माजी कॅप्टन

भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना यांना आयपीएलमध्ये जास्त महत्त्व दिलं जात असल्याने त्यांची माजी भारतीय कॅप्टन बिशन सिंह बेदी यांनी निंदा केली आहे. दोघेही टीम इंडियामध्ये खेळण्याचे लायक नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

Dec 19, 2015, 09:05 PM IST

भारत टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो

पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकू शकतो असा विश्वास भारताचे माजी कर्णधार कृष्णामचारी श्रीकांत यांनी व्यक्त केलाय. भारत या वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. 

Nov 19, 2015, 01:06 PM IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना

दहा जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईहून आज पहाटे रवाना झालाय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पहिलाच दौरा आहे.

Jul 7, 2015, 09:14 AM IST

विराट कोहलीने केले रहाणेचे असे हाल...

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कोलकतामध्ये जोरदार सराव केला आणि नंतर पार्टीही केली. शनिवारपासून दोन दिवसांचे शिबिरात पहिल्या दिवशी फिटनेस टेस्ट झाली. त्यानंतर अजिंक्य रहाणे याचा २७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

Jun 7, 2015, 06:45 PM IST

भारतीय संघात कोहलीच्या टक्करचं कोणी नाही - बॅरी रिचर्ड्सच्या

विराट कोहलीला टक्कर देऊ शकेल असा कोणीही भारतीय संघात नाही, पण त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उंची गाठायला त्याला अजून बराच लांब प्रवास करावा लागणार असल्याचे मत  दक्षिण आफ्रिकेचे महान फलंदाज बॅरी रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे. 

Feb 24, 2015, 07:56 PM IST

विराटच्या ‘प्यार के साइट इफेक्ट’ टीम इंडियावर

इंग्लंडमध्ये अपमानजनकरित्या पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआयने यावर मंथन सुरू केले आहे. मालिका सामन्यामध्ये 1-3 असा पराभव झालेल्या भारतीय संघाची सर्व बाजुंनी आलोचना होत आहे. स्लिपच्या खेळाडूंनी अनेक झेल सोडले. टॉप ऑर्डरचे फलंदाज पूर्णपणे निष्क्रिय ठरले. 

Aug 21, 2014, 06:34 PM IST

आणि विराट ढसाढसा रडला!

सुपर ८ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १२१ धावांत रोखता न आल्याने भारताचा टी-२० विश्वचषकातील गाशा गुंडाळला आणि यामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला अक्षरशः रडू कोसळले. तो बराच वेळ रडत होता.

Oct 3, 2012, 05:21 PM IST

टीम इंडियाचं कसं होणार?

वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला होम ग्राऊंडवरील ११ विजयानंतर अखेर अहमदाबादच्या मोटेरावर पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा टीम इंडियाची टॉप बॅटिंग ऑर्डर फ्लॉप ठरली.

Dec 6, 2011, 05:33 PM IST

अजित आगरकर नाराज, मुंबईत आला परत,

मुंबईच्या रणजी टीममध्ये नविन वाद उफाळून आला आहे. ओरिसाविरुद्धच्या मॅचमध्ये फास्ट बॉलर अजित आगरकरला वगळ्यात आलं. प्लेंईग इलेव्हेनमध्ये समावेश न केल्यानं अजित आगरकर मुंबईमध्ये परत आला आहे.

Nov 30, 2011, 02:40 PM IST