अजित आगरकर नाराज, मुंबईत आला परत,

मुंबईच्या रणजी टीममध्ये नविन वाद उफाळून आला आहे. ओरिसाविरुद्धच्या मॅचमध्ये फास्ट बॉलर अजित आगरकरला वगळ्यात आलं. प्लेंईग इलेव्हेनमध्ये समावेश न केल्यानं अजित आगरकर मुंबईमध्ये परत आला आहे.

Updated: Nov 30, 2011, 02:40 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईच्या रणजी टीममध्ये नविन वाद उफाळून आला आहे. ओरिसाविरुद्धच्या मॅचमध्ये फास्ट बॉलर अजित आगरकरला वगळ्यात आलं. प्लेंईग इलेव्हेनमध्ये समावेश न केल्यानं अजित आगरकर मुंबईमध्ये परत आला आहे. टीम मॅनजेमेंटनं मला टीममध्ये न घेण्याचा निर्णय मॅचच्या आदल्यादिवशी संध्याकाळी सांगितला. एका सिनियर क्रिकेटपटूला अशी वागणूक देणं योग्य नसल्याच मत त्यानं व्यक्त केलं आहे.

 

अजित आगरकरनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतलेल्या सहा विकेट्स अजूनही क्रिकेटप्रेमी विसरलेले नाही. आपल्या स्विंगबॉलिंगवर त्यानं भल्या-भल्या बॅट्समनना गुडघे टेकायला भाग पाडलं होतं. त्यानं भारतासाठी २६ टेस्टस आणि १९१ वन-डे खेळल्या आहेत. मात्र २००७ पासून तो भारतीय टीममध्ये नाही. त्याला भारतीय टीममध्ये संधी मिळाली नसली तरी मुंबईच्या रणजी टीममधून खेळतांना त्यानं मुंबईला अनेक अवस्मिरणीय विजय मिळवून दिले आहेत. मात्र, मुंबईच्या या सिनियर क्रिकेटपटूला ओरिसाविरुद्धच्या मॅचमध्ये वगळल्यानंतर एकच वाद निर्माण झाला आहे. टीममधून डावल्यामुळे आगरकरनं तीव्र नाराजी दर्शवली आहे. आणि तो यामुळे मुंबईतही परतला आहे.

 

आगरकर या प्रकारामुळे नाराज असला तरी, मागील सहा महिन्यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. फिटनेस आणि फॉर्मसाठी झगडणा-या आगरकरनं मुंबईला परत येत आपली नाराजी तर दर्शविली आहे. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे