नवी दिल्ली : इरफान पठान काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघात दिसू शकतो. सैयद अली ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरी त्याची टीममध्ये वापसी होऊ शकते. त्याने या ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त १७ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याच्या बॅटनेही चांगली कामगिरी केली होती.
भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा सुद्धा लेफ्ट आर्म बॉलरसाठी प्रयत्नशिल असतो. त्याला लेफ्ट आर्म बॉलरचा योग्य वापर करणं चांगलंच येतं. सध्या सगळीकडेच लेफ्ट आर्म बॉलरचा बोलबाला आहे. मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स फॉकनर हे सगळेच चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आशिष नेहराला संघात पुन्हा संधी देऊन हे दाखवून दिलं. त्यामुळे येणाऱ्या आगामी सामन्यांमध्ये भारतीय संघात इरफान पठानची वापसी झाली तर आश्चर्य वाटायला नको.