video : सोचो जीत की

येत्या १२ जानेवारी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी टीमला चीअर अप करण्यासाठी स्टार स्पोर्ट्सने नवा व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. जेव्हा आपले इरादे मजबूत असतील तर काहीही अशक्य नसते हा संदेश या व्हिडीओतून देण्यात आलाय. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ. 

Updated: Dec 21, 2015, 09:08 AM IST
video : सोचो जीत की title=

मुंबई : येत्या १२ जानेवारी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी टीमला चीअर अप करण्यासाठी स्टार स्पोर्ट्सने नवा व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. जेव्हा आपले इरादे मजबूत असतील तर काहीही अशक्य नसते हा संदेश या व्हिडीओतून देण्यात आलाय. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ. 

या दौऱ्यात भारतीय संघ पाच वनडे आणि तीन टी-२० खेळणार आहे. १२ ते ३१ जानेवारीदरम्यान हे सामने पर्थ, ब्रिस्बेन, मेलबर्न, कॅनबेरा, सिडनी आणि अॅडलेडच्या मैदानावर हे सामने खेळवण्यात येतील.

या दौऱ्यासाठी भारतीय संघात युवराज सिंग आणि आशिष नेहरा या अनुभवी खेळाडूंना पुन्हा स्थान देण्यात आलेय. तसेच दोन नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आलीय. संपूर्ण दौऱ्यात महेंद्रसिंग धोनी भारताचे नेतृत्व करणार आहे.