heavy rain

राज्यात ५ ते १४ ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीचा इशारा

राज्यात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात 5 ते 14 ऑक्टोबर या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली असून याकाळात शेतक-यांनी कापणी केलेला अथवा कापणी योग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा असं आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलंय. 

Oct 3, 2017, 07:15 PM IST

तुफान पावसामुळे हैदराबादमध्ये पूरस्थिती, तिघांचा मृत्यू

आंध्रप्रदेशातील हैदराबाद शहरात सोमवारी तुफान पाऊस पडला. त्यामुळे शहरभर पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच तिघा जणांच्या मृत्यूचे वृत्त आले आहे. दरम्यान, सरकारने शाळा-महाविद्यालये काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 3, 2017, 02:28 PM IST

४८ तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या ४८ तासांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तवली आहे.

Sep 20, 2017, 05:53 PM IST

मुंबईत मुसळधार पावसानं घेतला तरूणीचा बळी

कालच्या मुसळधार पावसानं एका तरूणीचा बळी घेतला आहे. वसईच्या मैत्री शाह या १७ वर्षीय कॉलेज तरुणीचा लोकलमधून पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी कॉलेज आटोपून घरी परत येत असताना बोरीवली आणि दहीसर दरम्यान चालत्या लोकलमधून पाय घसरून खाली पडली आणि जागेवरच मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यूदेह अजून ताब्यात मिळालेला नाही. 

Sep 20, 2017, 02:55 PM IST

राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

Sep 20, 2017, 01:23 PM IST